शैक्षणिक
…या महाविद्यालयात स्ता सुरक्षा माह उत्साहात संपन्न
न्युजसेवा
कोपरगाव- (प्रतिनिधी)
कोपरगाव येथील स्थानिक के.जे.सोमैया महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व शहर पोलिस ठाणे,कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना’ उपक्रमाअंतर्गत ‘रस्ता सुरक्षा : जीवन सुरक्षा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
रस्ता सुरक्षा जीवन सुरक्षा योजना ही रस्ते वाहतूक अपघातांमुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी सुरू केलेली योजना आहे. या योजनेचा उद्देश रस्ता सुरक्षा नियम आणि नियमांचे पालन करून रस्ते अपघात रोखणे हा आहे.हा उपक्रम नुकताच के.जे.सोमैय्या महाविद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
या उपक्रमास कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक भगवान मथुरे,श्रीकांत कुऱ्हाडे,प्राध्यापिका आवारे,प्राध्यापिका कदम,प्राध्यापिका अहिरे यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक व इतर विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी भगवान मथुरे यांनी ‘रस्ता सुरक्षा व नागरिकांचे कर्तव्य’ या विषयावर बोलतांना रस्ता सुरक्षा ही सर्वांची जबाबदारी असुन वाहतुकीच्या नियमांचे योग्य पालन करणे गरजेचे असल्याचे सांगितले.रस्ते अपघातात होणाऱ्या जीवितहानीची बाब गंभीर असून त्यासाठी प्रत्येक वाहनचालकाने वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळले पाहीजे असे आवाहन त्यांनी केले आहे.
अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय ठाणगे यांनी दुचाकी वर येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वाहतूक परवान्याची सुविधा मिळण्यासाठी महाविद्यालय स्तरावर कॅम्प आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
या अभियानाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. बी.एस.गायकवाड यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ.संजय दवंगे यांनी मानले आहे.
या कार्यक्रमासाठी प्राध्यापिका आवारे, प्राध्यापिका कदम,प्राध्यापिका अहिरे यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक व इतर विद्यार्थी उपस्थित होते.