जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…हे अभिनेते येणार कोपरगावात

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने सालाबादप्रमाणे याहीवर्षी एच.एस.सी.व एस.एस.सी. परीक्षा २०२४ मध्ये विशेष नैपुण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा गौरव सोहळा आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.या कार्यक्रमासाठी मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक प्रसाद ओक उपस्थित राहणार असल्याची माहिती कोपरगाव राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने नुकतीच देण्यात आली आहे.

 

कोपरगावात प्रतिवर्षी आ.आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून एच.एस.सी.एस.एस.सी.परीक्षेत विशेष नैपुण्य मिळविणाऱ्या कोपरगाव मतदार संघातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा गौरव सोहळा आयोजित केला जातो.त्याप्रमाणे याहीवर्षी तो उद्या सकाळी १० वाजता संपन्न होत आहे. 

  बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी तसंच पालकांचं लक्ष दहावीच्या निकालाकडे लागून होतं.हे दोन्ही वर्ष विद्यार्थ्यांसाठी निर्णायक मानले जातात.विद्यर्थी तसंच पालकांची प्रतिक्षा नुकतीच संपुष्टात आली आहे.राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परिक्षेचा निकाल जाहीर झाला असून राज्याचा निकाल ९३.८३ लागला आहे.सालाबादाप्रमाणे याही वर्षी या परिक्षेत मुलींनी बाजी मारली आहे.यात ९२.०५ टक्के मुलं वत्तीर्ण झाले असून मुलींची टक्केवारी ही ९५.८७ टक्के एवढी आहे.यात कोपरगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांनी मोठे यश मिळाले आहे.त्यांचा प्रतिवर्षी आ.आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून एच.एस.सी.एस.एस.सी.परीक्षेत विशेष नैपुण्य मिळविणाऱ्या कोपरगाव मतदार संघातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा गौरव सोहळा आयोजित केला जातो.त्याप्रमाणे याहीवर्षी रविवार दि.०९ रोजी सकाळी १०.०० वा.’कृष्णाई बॅक्वेट हॉल’ कोपरगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे.
   या कार्यक्रमासाठी माजी आ.अशोक काळे,गौतम बँकेच्या माजी संचालिका पुष्पाताई काळे,आ.आशुतोष काळे,जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ.मच्छिंद्र बर्डे तसेच सर्व संचालक मंडळ व उद्योग समूहाच्या संलग्न संस्थांचे पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळा कार्यक्रमासाठी पालकांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कोपरगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close