शैक्षणिक
कोपरगाव तालुक्यातील…या शाळेचा निकाल जाहीर
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ मार्फत घेण्यात आलेल्या एस.एस.सी परीक्षेचा निकाल नुकताच मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला असून यात कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी १०० टक्के निकालाची परंपरा याही वर्षी कायम राखली आहे.
या परीक्षेमध्ये प्रथम तीन क्रमांक पुढे दर्शवले आहे.कु.पेखळे साक्षी महेश ९३ टक्के,प्रथम क्रमांक,वाघ ओम संदीप ९३ टक्के,द्वितीय,कु.भाकरे तनुजा रामदास ८८.३० टक्के,तृतीय कु.शिंदे ऋतुजा दत्तात्रय ८४.८० टक्के,कु.गाडे ईश्वरी अशोक ८४ टक्के गुण मिळवले आहे.या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
शाळेचा निकाल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शंभर टक्के लागला.एकूण ८६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते.विशेष म्हणजे तब्बल ४१ विद्यार्थी विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे.तर ६० टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेले ३१ विद्यार्थी आहे.
दरम्यान यशस्वी विद्यार्थ्यांचे आ.आशुतोष काळे,स्थानिक स्कुल समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर कुलकर्णी,मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी सर्व विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले आहे.