जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

शहरातही…या शाळेचा निकाल जाहीर

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ मार्फत घेण्यात आलेल्या एस.एस.सी परीक्षेचा निकाल नुकताच मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालाअसून यात कोपरगाव शहरातील संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी १०० टक्के निकालाची परंपरा याही वर्षी कायम राखली आहे.

या परीक्षेत प्रथम क्रमांक कुमार आदित्य कोद्रे ९४.३० टक्के,द्वितीय क्रमांक कुमार प्रितेश पवार ९१.६० टक्के,तृतीय क्रमांक कुमार विनीत आढाव ८९.६० टक्के मिळविला आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

  शाळेचा निकाल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शंभर टक्के लागला. एकूण ४९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते.विशेष म्हणजे तब्बल २५ विद्यार्थ्यांनी ८० टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहे तर २० विद्यार्थ्यांनी ७५ टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहे.
  दरम्यान या विद्यार्थ्यांमध्ये वैदेही खैरे ८८.४० टक्के,साक्षी गवळी ८७.४० टक्के, प्रतिक बारगळ ८७.२०,सारा शेख ८५.०० टक्के,प्रेम देवडे-८५.०० टक्के,नमन शर्मा-८४.१० टक्के या सर्व विद्यार्थ्यांनी नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेची शंभर टक्के निकालाची परंपरा तसेच कृतीयुक्त शिक्षण, वेळेचे योग्य नियोजन व विद्यार्थ्यांकडून पूर्वपरीक्षेच्या माध्यमातून सराव करून घेतल्याने शाळेची गुणवत्ता उंचावली आहे.
दरम्यान यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष राजेंद्र झावरे,सचिव किरण भोईर,कैलास जाधव,विशाल झावरे, मुख्याध्यापक सचिन मोरे व सर्व शिक्षकांनी सर्व विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close