जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…या महाविद्यालयात वस्तू संग्रहालयाचे उद्घाटन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव येथील स्थानिक के.जे.सोमैया महाविद्यालयात नुकतेच ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाचे उद्घाटन संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

सोमैय्या महाविद्यालयातील हे वस्तू संग्रहालय कोपरगाव तालुक्यातील पहिले संग्रहालय असून यामुळे कोपरगावच्या ऐतिहासिक वैभवात निश्चितच भर पडेल.तसेच संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे संग्रहालय ज्ञानाचे केंद्र ठरेल”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.

सदर प्रसंगी कोपरगाव तालुक्याचे आ.आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते व कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,सचिव ॲड.संजीव कुलकर्णी,जवाहरभाई शहा,सुनील बोरा,प्रशांत ठोंबरे, संस्थेचे विश्वस्त संदीप रोहमारे,डॉ.रिद्धी गोराडिया आदी मान्यवर उपस्थित होते.

    के.जे.सोमैया महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या वतीने निर्मित या वस्तू संग्रहालयामध्ये प्राचीन भारतातील जनपद,गुप्त,ग्रीक,सातवाहन,विजयनगर,बहामनी,निजामशाही,आदिलशाही,कुतुबशाही,शिवकालीन,पेशवेकालीन व ब्रिटीश कालखंडापर्यंतच्या दुर्मिळ नाण्यांबरोबरच जुन्या दुर्मिळ तलवारी,ढाल व अन्य शस्त्रांची गॅलरी,पेशवेकालीन इशारतीची तोफ,ब्रिटीशकालीन कुलुपे,दुर्बीण (टेलिस्कोप),दिशादर्शक यंत्र (कंपास),भिंग,टेलीफोन,कॅलेंडर, दरवाजावरील बेल,ताम्र-पाषाणयुगीन मृदुभांडे अशा ऐतिहासिक वस्तूंचा समावेश आहे.

    कोपरगाव तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मंदिरांचे व वास्तूंचे दुर्मिळ फोटो,छत्रपती शिवाजी महाराजांचे दुर्मिळ चित्र,छत्रपती संभाजी महाराजांचे दुर्मिळ चित्र हे देखील या संग्रहालयामध्ये ठेवण्यात आले आहे.

    संस्थेचे अध्यक्ष मा.अशोकराव रोहमारे यांनी ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाचे उद्दिष्टे नमूद करतानांच या संग्रहालयाच्या माध्यमातून आपला प्राचीन इतिहास व त्याकाळची साधने नवीन पिढीला कळतील असे सांगितले.या संग्रहालयातील ऐतिहासिक वस्तू ह्या महाबळेश्वर,पुणे,मुंबई अशा विविध ठिकाणांहून संग्रहित केलेल्या असून त्या मिळविण्यासाठी प्रो.(डॉ.) के.एल.गिरमकर,नाणेतज्ञ पद्माकर प्रभुणे,मोडी लिपी तज्ञ महेश जोशी यांची मदत झाल्याची माहिती इतिहास विभागाचे प्रा.डॉ.दिलीप बागुल यांनी दिली.

   आपला प्राचीन ठेवा जतन करण्याच्या उद्देशाने निर्माण केलेल्या या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयासाठी विद्यार्थी, पालक व कोपरगांव परिसरातील इतिहासप्रेमी नागरिकांनी आपल्याकडील प्राचीन ऐतिहासिक वस्तू या संग्रहालयासाठी द्याव्यात असे आवाहन संस्थेचे विश्वस्त संदीप रोहमारे यांनी केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close