जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
संपादकीय

   गुलामीची साखळी तोडण्याची संघी…?

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
      
    भाजपने रविवारी पहिली यादी जाहीर केली होती.त्यानंतर आता अजित पवारांच्या पक्षानेही पहिली यादी जाहीर करत निवडणुकीसाठी आपला पहिला डाव टाकला आहे.पहिल्या यादीत अजित पवारांनी कोपरगाव विद्यमान आ.आशुतोष काळे यांचेसह ३८ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.शरद पवारांपासून फारकत घेत भाजपसोबत गेलेल्या अजित पवारांसाठी ही विधानसभा निवडणूक अत्यंत निर्णायक आहे.यात भाजपच्या माजी आ.स्नेहलता कोल्हे यांचेसह त्यांचे युवराज विवेक कोल्हे यांनी आपली तलवार गृहमंत्री अमित शहा यांच्या साक्षीने म्यान केली असली तरी यातून सामान्य चेहरा समोर येण्याची शक्यता वाढली असून आ.आशुतोष काळे यांना आपली लढत अवघड होण्याची शक्यता वाढली असल्याचे मानले जात आहे.

   

सन-१९९९ साली झालेल्या निवडणुकीत माजी खा.शंकरराव काळे यांनी तत्कालीन नेते नामदेवराव परजणे विजयी होत आहे हे दुपारपर्यंत झालेल्या मतदानात अचूकपणे हेरले होते.त्यावेळी माजी खा.शंकरराव काळे यांनी आ.कोल्हे यांचेशी संधान साधून असेच दोन पावले मागे घेऊन तत्कालीन आ.शंकरराव कोल्हे यांना विजयी केले होते.त्यातील राजकारण अद्याप कार्यकर्ते आणि जनता विसरलेली नाही.

  सदरचे सविस्तर वृत्त असे की,’आज राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गटाने) आज आपले पत्ते खुले करत पहिली यादी जाहीर केली आहे.तर याआधीच भाजपने रविवारी पहिली यादी जाहीर केली होती.त्यानंतर आता अजित पवारांच्या पक्षानेही पहिली यादी जाहीर करत निवडणुकीसाठी आपले डाव उघड करण्यास प्रारंभ केला आहे.तर दुसरीकडे महायुतीमध्ये काही मतदारसंघात उमेदवारीवरुन वाद असल्याचे समोर आले होते.त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली होती.कोपरगाव विधानसभा मतदारसंघ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला गेल्यामुळे भाजपा नेत्या तथा सचिव,माजी आ.स्नेहलता कोल्हे यासह त्यांचे युवराज विवेक कोल्हे मोठ्या प्रमाणावर नाराज असल्याच्या चर्चा चौकाचौकात सुरू झाल्या होत्या.या दरम्यान आज माजी आ.कोल्हे यांनी फेसबुक पोस्ट करत आपण विधानसभा निवडणूक लढवत नसल्याचे जाहीर केले आहे.त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे.तर सामान्य मतदार आपली दिवाळी कशी जाणार या चिंतेत गेला असल्याचे मानले जात आहे.कोल्हे यांनी आगामी राज्य सभेचे गाजर (?) दाखवले असल्याचे समजते.त्यामुळे त्यांची आगामी सोय होणार असली तरी कार्यकर्ते आणि त्यांचे लाभार्थी मोठ्या प्रमाणावर अडचणीत आले आहे.त्यामुळे त्यांची चलबिचल वाढली तर आश्चर्य वाटावयास नको.अशातच इतिहास साक्षी आहे.

  

जिल्ह्यातील नेते निवडणुकात जेंव्हा एकत्र येतात त्यावेळी सामान्य मतदार त्यांचे विरुध्द जात असल्याचा अनुभव आहे.त्यासाठी गणेश सहकारी साखर कारखान्याची सन-२००६ ची निवडणूक साक्षी आहे.त्याचा तिखट अनुभव खा.बाळासाहेब विखे आणि माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी घेतला होता.

  ज्या ज्या वेळी उत्तर नगर जिल्ह्यातील नेते निवडणुकात एकत्र येतात त्यावेळी सामान्य मतदार त्यांचे विरुध्द जात असल्याचाअनुभव आहे.त्यासाठी गणेश सहकारी साखर कारखान्याची सन-२००६ ची निवडणूक साक्षी आहे.त्यावेळी तत्कालीन खा.बाळासाहेब विखे आणि माजी मंत्री शंकरराव कोल्हे हे अशीच गर्जना देत एकत्र आले होते.त्यावेळी ज्येष्ठ नेते स्व.चंपालाल सांड आणि काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व साई संस्थानचे माजी विश्वस्त एकनाथ गोंदकर आदींनी त्यांच्या विरुध्द दंड थोपटले होते.व त्यांचे या बलाढ्य शक्ती विरुध्द नऊ संचालक निवडून आले होते.तर अन्य दोन ते तीन संचालक केवळ एक ते तीन मतांनी पराभूत झाले होते.त्यानंतर लगोलग शिर्डी नगरपरिषद निवडणूक संपन्न झाली होती.त्यावेळी डॉ.एकनाथ गोंदकर यांचा विकास मंडळ विजयी झाले होते.याचा विसर पडण्याचे कारण नाही.याशिवाय १९९५ च्या लोकसभा निवडणुकीत असाच अनुभव येऊन भाजपचे सामान्य कार्यकर्ते भीमराव बडदे विजयी झाले होते.नोव्हेंबर २०१६ ला कोपरगाव नगर परिषद निवडणुकीत काळे- कोल्हे विरुध्द झालेल्या निवडणूकीत भाजपचे अपक्ष उमेदवार विजय वहाडणे यांना जनतेने राज्यात सर्वाधिक मतांनी विजयी केले होते.

 

आपल्या ताब्यातील सहकारी साखर कारखाने,बाजार समित्या,बँका,तत्सम सहकारी संस्थांच्या निवडणुका कपाटात बिनविरोध होत आहे.मात्र गावोगावच्या ग्रामपंचायती आणि सोसायटी यांच्या निवडणुका जनतेत झोंब्या लावण्यासाठी उपयुक्त ठरत असून दोन गटात गावाची व मतदारांची विभागणी होऊन आपोआप त्यांना गुलामीत जेरबंद केले जात आहे.त्याला मतदार वैतागला आहे.

   उत्तर नगर जिल्ह्यात नव्हे तर राज्यात पश्चिम महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्यातून शेतकरी मालक बणण्याऐवजी त्यांना गुलाम बनवून नेते संस्थानिक बनले असून ते जनतेचे हित पाहण्याऐवजी स्वहित पाहत असल्याचे वांरवार उघड झाले आहे.याला सामान्य जनता कंटाळली आहे.त्यांना विधानसभा आणि लोकसभा निवडणूक ही आपल्या संस्थांना संरक्षण कवच पुरविण्यासाठी आमदारकी आणि खासदारकी हवी आहे हे न समजण्या इतकी जनता आता अडाणी राहिलेली नाही.त्यामुळे शेतीचे पाणी गेले,रोजगार गेला,शेतकरी उद्ध्वस्त झाला,साखर कामगार नागवला गेला आहे.त्याच्या शेती मालास भाव देण्याऐवजी त्याला अनुदानरुपी भिक दिली जात आहे.शेतकऱ्यांच्या उसातून प्रतिटन ५०-१०० रुपयांची कपात करून (त्यांचा खिसा मारून) प्रत्येक उपपदार्थ निर्मितीच्या वेळी २००-५०० चा भाव उसाला वाढवून दिला जाईल हे वचन स्व.नेते आणि त्यांचे वारस विसरले आहे.उसास प्रती टन भाव ५- ६ हजार मिळण्याऐवजी त्यांना वार्षिक सभेस हाती एकाच दुकानाचा केवळ पन्नास रुपयांचा चिवडा आणि संचालक यांना मासिक चारशे रुपये बिदागी दिली जात आहे.त्यांना कारखान्याचे इतिवृत्त वाचून न दाखवता शिपाई त्यांच्या सह्या घेत आहे.मतदारांची राजरोस खरेदी होत आहे.सभांना महिला आणि पुरुष रोजंदारीवर आणले जात आहे.शेती पाणी  उद्योगांना आणि सग्यासोयऱ्याना वाटून दिले गेले आहे.पिण्याचे पाणी दारुस चोरून वापरले जात आहे.निवडणुकिवर हजारो कोटी उधळले जात आहे.त्यामुळे सभासद आणि मतदारांना ही मोठी संधी समजली जात आहे.

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी आपल्या चरित्रात माजी मंत्री काळे – कोल्हे हे कसे कार्यकर्ते आणि मतदारांना कसे बनवतात याचे स्वतः साक्षीदार बनून मासलेवाईक उदाहरण दिले आहे.तर स्वतः माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनीही आपल्या पुस्तकात याची कबुली दिली असताना जर मतदार संघातील मतदार आणि कार्यकर्ते बोध घेणार नसतील तर त्यांना विनाशापासून  स्वतः ब्रह्मदेव वाचवू शकणार नाही.

   दरम्यान राज्यातील विशेषतः साखर पट्ट्यातील मतदार आता निवडणूक खुराक घेऊन त्यांना आस्मान दाखविण्याईतका शहाणा झाला आहे नव्हे त्यांना राजकीय साक्षरता साध्य झाली आहे.त्यामुळे सन-१९९९ साली झालेल्या निवडणुकीत माजी खा.शंकरराव काळे यांनी तत्कालीन नेते नामदेवराव परजणे विजयी होत आहे हे दुपारपर्यंत झालेल्या मतदानात अचूकपणे हेरले होते.त्यावेळी माजी खा.शंकरराव काळे यांनी तत्कालीन आ.शंकरराव कोल्हे यांचेशी संधान साधून असेच दोन पावले मागे घेऊन तत्कालीन आ.शंकरराव कोल्हे यांना विजयी केले होते.

सन-१९९९ साली झालेल्या निवडणुकीत माजी खा.शंकरराव काळे यांनी तत्कालीन नेते नामदेवराव परजणे विजयी होत आहे हे दुपारपर्यंत झालेल्या मतदानात अचूकपणे हेरले होते.त्यावेळी माजी खा.शंकरराव काळे यांनी तत्कालीन आ.शंकरराव कोल्हे यांचेशी संधान साधून असेच दोन पावले मागे घेऊन तत्कालीन आ.शंकरराव कोल्हे यांना विजयी केले होते.विशेष म्हणजे त्यावेळी खासदार आणि व्याही असलेले बाळासाहेब विखे यांनीही नामदेवराव परजणे यांना साथ दिली नसल्याने त्यांना अरण्यरुदण करण्याची वेळ आली होती.

  विशेष म्हणजे त्यावेळी खासदार आणि व्याही असलेले बाळासाहेब विखे यांनीही नामदेवराव परजणे यांना साथ दिली नसल्याने त्यांना अरण्यरुदन करण्याची वेळ आली होती.त्यातील राजकारण अद्याप कार्यकर्ते आणि जनता विसरलेली नाही.बाजार समित्या,सहकारी कारखाना,बँका,तत्सम सहकारी संस्थांच्या निवडणुका आता दिवास्वप्न ठरल्या आहेत.मात्र गावोगावच्या ग्रामपंचायती आणि सोसायटी यांच्या निवडणुका जनतेत झोंब्या लावण्यासाठी उपयुक्त ठरत असून दोन गटात गावाची व मतदारांची विभागणी होऊन आपोआप त्यांना गुलामीत जेरबंद केले जात आहे.त्यामुळे आता वर्तमान विधानसभा संधी जनतेला पुन्हा एकदा चालून आली आहे.येथील नेत्यांना   साठवलेली संपत्ती बरोबर नेता येत नाही हे कोणीतरी सांगायला हवे पण मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची हा खरा यक्ष प्रश्न आहे.

   “दान दिया संग लगा..
     खाया पिया अंग लगा..
     बाकी बचा जंग लगा”

(अर्थ – इथं जे दान करता ते मेल्या नंतर सोबत येईल.
इथं जे खाता ते अंगी लागेल
बाकी,शिल्लक राहणार गंजून जाईल.)

  हे सांगण्यासाठी राज्य घटनेने निवडणूक हे मोठे माध्यम निर्माण करून दिले आहे.

त्यामुळे उमेदवारी इच्छुक भाजप निष्ठावान विजय वहाडणे,राष्ट्रवादीचे निष्ठावान प्रवक्ते संदीप वर्पे,सेनेचे निष्ठावान माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे,सामाजिक कार्यकर्ते संजय काळे,माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील,मराठा महासंघ,ऍड.दिलीप लासूरे,शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन औताडे आदींना एकत्र येऊन एकास एक उमेदवार द्यावा लागणार आहे.तरच काही पदरी पडणार आहे.अन्यथा वर्तमान नेत्यांचे जोडे उचलण्यात आपले आयुष्य खर्ची पडणार आहे.त्यांनी आपल्या महत्त्वाकांक्षेला आवर घालण्याची तेवढी तसदी घ्यावी लागणार आहे तरच काही अंशी यश पदरी पडणार आहे.

मो.-९४२३ ४३ ९९४६.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close