शैक्षणिक
…या शालांत परीक्षेच्या विद्यार्थ्यांना निरोप !
न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील जनता इंग्लिश स्कूल येथे शालांत परीक्षा मार्च २०२३-३०२४ च्या विद्यार्थ्यांना नुकत्याच मान्यवरांच्या उपस्थितीत शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.सदर कार्यक्रम प्रसंगी व्यवस्थापन समितीचे जेष्ठ सदस्य चंद्रकांत लोखंडे अध्यक्षस्थानी होते.तर सल्लागार समितीचे ज्येष्ठ सदस्य मधुकरराव साबळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सर्वांच्या शालेय जीवनातील एक महत्वाचा दिवस म्हणजे शेवटचा दिवस ज्या दिवशी आपण शाळा सोडून दुसऱ्या शाळेत जातो किंवा उच्च शिक्षणासाठी दुसऱ्या महाविद्यालयांत प्रवेश घेतो.तो आयुष्यात महत्वाचा गणला जातो तो प्रत्येकाच्या आठवणींचा ठेवा मानला जातो.तो नुकताच कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे जनता इंग्लिश स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
सदर कार्यक्रम प्रसंगी दहावीला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला आहे.सदर प्रसंगी माता पालक व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष निलेश सांगळे,भगवान शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रम प्रसंगी दहावीतील कुमारी श्रावणी भोसले या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले आपल्या बाल वयामध्ये शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्त्वाचे असते शिक्षक आपल्याला घडवत असतात विद्यार्थी म्हणून आपण त्यांच्या आज्ञाचे पालन करावे त्याचबरोबर दहावीतील राकेश करपे,धनश्री महानुभव,अपूर्वा गायकवाड इत्यादी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश मोरे सर यांनी केले.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दहावीचे वर्गशिक्षक सुनील वाघमारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार शरद आंबीलवादे यांनी मानले आहे.