जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

विवहितेची हत्या,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव शहराच्या पश्चिमेस साधारण दिड कि.मी.अंतरावर असलेल्या जेऊर पाटोदा ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी व लष्करी सेवेत असलेल्या टिळेकर वस्ती येथील रहिवासी असलेला संशयी जवान अरुण रतन दाभाडे याने परिचारिका असलेल्या आपल्या पत्नी पूजा दाभाडे (वय-२६) हिच्या डोक्यात हातोड्याने गंभीर वार करून तिचा जागीच खून केल्याची दुर्दैवी घटना आज उघडकीस आली आहे.त्यामुळे कोपरगाव शहर आणि तालुक्यात खळबळ उडाली आहे.

    

दरम्यान आरोपी याने मयत पत्नीच्या डोक्यात वार इतका मोठा केला होता की,त्या आघाताने मयत पूजा दाभाडे हिचा लहान मेंदू थेट बाहेर आला होता.व त्या ठिकाणी दिड-दोन इंच गोल खड्डा पडला होता अशी माहिती प्रत्यक्ष दर्शीनी दिली आहे.

    

मयत पूजा दाभाडे छायाचित्रात दिसत आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये कोपरगाव शहरात अनेक वेगवेगळ्या घटना घडत आहेत.यामध्ये चोऱ्या,हाणामारी,गुन्हेगारी,कौटुंबिक कलह अशा प्रकारचे गुन्हे मोठ्या प्रमाणावर दिसून येतात,त्यातच आता आणखी एक धक्कादायक व भयानक खुनाची घटना समोर आली आहे.त्यातील आरोपी लष्करी जवान अरुण दाभाडे हा असल्याची प्राथमिक माहिती हाती आली असून तो रजेवर आला होता.त्याची सेवा केवळ आठ महिने बाकी असताना हि घटना भर दुपारी रस्त्यावर दुपारी २.१५ वाजेच्या सुमारास त्याचे हातातून घडली आहे.घटनेनंतर तो थेट पोलीस ठाण्यासात जात असताना काही धाडसी तरुणांनी त्यास पडकून पोलिसांच्या हवाली केले असल्याची माहिती हाती आली आहे.

घटनास्थळी कोपरगाव शहर पोलीस अधिकाऱ्यांनी धाव घेतली होती.त्यावेळी उपस्थित नागरिक दिसत आहे.

दरम्यान मयत पूजा दाभाडे हि एस.जी.विद्यालयाजवळ असललेल्या एका खाजगी रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत होती.तिचे माहेर जेऊर पाटोदा तर सासर साई धाम आश्रम जवळ होते.तर मुले येवला येथे शिक्षणासाठी होते.त्यांचा सांभाळ आरोपीचे आई वडील करत होते.त्याने या पूर्वीही सदर पत्नीस संशयावरून आठ महिन्यांपूर्वी येवल्यात कोयत्याने वार केला होता.मात्र उपचार नंतर सुदैवाने ती त्यात वाचली होती.मात्र आज दुपारी शिवरस्ता चांदगव्हाण वळणावर जेऊर पाटोदा हद्दीत हि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.त्यामुळे पोलिसही चक्रावून गेले आहे.

दरम्यान या प्रकरणी शिर्डी येथील विभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी,सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा,पोलीस उपनिरीक्षक भरत दाते,रोहिदास ठोंबरे आदींनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

दरम्यान या प्रकरणी फिर्यादी किरण तुळशीराम पठारे (वय-६२) रा.जेऊर पाटोदा यांनी गुन्हा क्रं.७४/२०२४ भा.द.वि.कलम ३०२ प्रमाणे दाखल केला आहे.त्यात त्यांनी सदर मयत महिलेस तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या डोक्यात हातोड्याने वार करून जबर मारहाण करून तिला जीवे ठार मारले असल्याचे म्हटले आहे.दरम्यान या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close