जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

जागतिक स्तनपान सप्ताह उत्साहात संपन्न

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगांव नजीक असलेल्या राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशनच्या नर्सिग कॉलेज व राष्ट्रसंत जनार्धन स्वामी नर्सिग कॉलेज येथे जागतिक स्तनपान सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

सदर प्रसंगी कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी एक नाटिका सादर करत जन जागृती केली.व स्तनपानाचे फायदे व स्तनपान करवयाच्या स्थिती याबद्दल माहिती दिली आहे.तसेच रुग्णालयाला भेट देणाऱ्या गर्भवती महिलासाठी गुळ शेंगदाणा लाडुचे वाटप देखील केले आहे.

ऑगस्ट महिन्यात जागतिक स्तनपान सप्ताह सुरू होतो जो जगभरात स्तनपानाबाबत जागरुकता वाढवणारी वार्षिक मोहीम आहे.या सप्ताहाची स्थापना वर्ल्ड अलायन्स फॉर ब्रेस्टफीडिंग ऍक्शन (WABA) द्वारे करण्यात आली.जे लोकांना त्यांच्या स्तनपानाच्या प्रवासात समर्थन,सक्षम आणि प्रोत्साहन देण्यासाठी कार्य करते.जागतिक स्तनपान सप्ताह दरवर्षी १-७ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.युनिसेफच्या अहवालानुसार जगातील एकूण बालकांपैकी सुमारे ६० टक्के बालकांना सहा महिन्यांपर्यंत आवश्यक स्तनपान मिळत नाही.त्यासाठी हा दिन जगभर साजरा करण्यात येत आहे.कोपरगावतही राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशनच्या नर्सिग कॉलेज व राष्ट्रसंत जनार्धन स्वामी नर्सिग कॉलेज येथे तो मोठया उत्साहात संपन्न झाला आहे.

सदर प्रसंगी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सचिन जाधव,वैदयकीय अधिकारी डॉ.संजय उंबरकर,स्त्री रोगतज्ञ डॉ.लाडे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

सदर प्रसंगी कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी एक नाटिका सादर करत जन जागृती केली.व स्तनपानाचे फायदे व स्तनपान करवयाच्या स्थिती याबद्दल माहिती दिली आहे.तसेच रुग्णालयाला भेट देणाऱ्या गर्भवती महिलासाठी गुळ शेंगदाणा लाडुचे वाटप देखील केले.तसेच ग्रामीण भागातील गरोदर माता तसेच प्रसुती नंतरच्या माता याचीही मोलाची उपस्थिती लाभली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close