कोपरगाव तालुका
पुणतांबा फाटा ते झगडे फाटा रस्ता दुरुस्त करा अन्यथा आंदोलन

जनशक्ती न्यूजसेवा
धारणगाव-(प्रतिनिधी)
राष्ट्रीय महामार्ग १६o वरील झगडेफाटा ते पुणतांबा फाटा या दरम्यान पडलेले खड्डे तातडीने आठ दिवसाच्या आत बुजवावे अन्यथा दि.नोव्हेंम्बर रोजी झगडेफाटा चौफुलीवर मोठ्या प्रमाणात “रास्ता रोको” करण्यात येईल असा इशारा तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम विभाग आदींना चांदेकसारे परिसरातील झगडेफाटा,घारी,डाऊच खु॥डाऊच बु॥,जेऊर कुंभारी,येथील ग्रामस्थानी नुकताच दिला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग हा कामात कामापेक्षा इतर कामातच अधिक चर्चेत असतो.त्यांची चांगली कामे शोधणे म्हणजे मोठे दिव्यच.पाऊस हा निमित्त मात्र आहे.चांगल्या दर्जाचे रस्ते शोधणे अवघड आहे.अशीच अवस्था पुणतांबा फाटा ते झगडे फाटा या रस्त्याची अवस्था झाली असून नगर-मनमाड पाठोपाठ या रस्त्याची पार वाट लागली आहे.हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग -१६० “ब”शी संलग्न मानला जातो.त्याची दुरुस्ती करणे गरजेचे बनले आहे.
नुकत्याच संपलेल्या पावसाळ्याने रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.यावर्षी सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडल्याच्या नोंदी सर्वत्र झाल्या आहेत.त्यामुळे रस्त्यांचे वाटोळे झाले आहे.त्यातच सार्वजनिक बांधकाम विभाग हा कामात कामापेक्षा इतर कामातच अधिक चर्चेत असतो.त्यांची चांगली कामे शोधणे म्हणजे मोठे दिव्यच.पाऊस हा निमित्त मात्र आहे.चांगल्या दर्जाचे रस्ते शोधणे अवघड आहे.अशीच अवस्था पुणतांबा फाटा ते झगडे फाटा या रस्त्याची अवस्था झाली असून नगर-मनमाड पाठोपाठ या रस्त्याची पार वाट लागली आहे.हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग -१६० “ब”शी संलग्न मानला जातो.व नागपूर-मुंबई मार्गाचा हिस्सा समजला जातो.या पूर्वी २०११ साली या रस्त्यासाठी अनेकांनी आंदोलने केली होती.त्यावेळी जिल्हाधिकांऱ्यानी भेट दिल्यावर व अनेक प्रवाशांचे बळी घेतल्यावर हे काम सुरु करण्यात आले होते.वरील झगडेफाटा ते पुणतांबा फाटा दरम्यान रस्त्यावर मोठे खड्डे पडले असुन वहातुकीस अडथळा निर्माण होत असुन दिवसेंन दिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहे व कित्येक अपघातग्रस्तांना गंभीर दुखापत होऊन जीवित व वित्तीय हानी झाली आहे.त्या मुळे ग्रामस्थ संतापले आहे.संबंधीत सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावरील खड्डे आठ दिवसात बुजवावे अन्यथा दि ५ नोव्हेंम्बर रोजी झगडेफाटा चौफुलीवर चांदेकसारे पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठया प्रमाणात “रास्ता रोको” आंदोलन करणार असुन त्या नंतर संबंधीत विभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे तसेच यानंतर होणाऱ्या परीणामास हा विभागच सर्वस्वी जबाबदार राहील असा इशारा देण्यात आले आहे.
या प्रकरणी आपल्या मागण्यांचे निवेदन चांदेकसारे ग्रामपंचायतच्या वतीने तहसिलदार कोपरगाव,पोलिस निरीक्षक कोपरगाव पोलीस ठाणे,सहाय्यक अभियंता राष्ट्रीय महामार्ग १६o”ब” उप विभाग संगमनेर, सार्वजनिक बांधकाम उपविभाग कोपरगावचे सहाय्यक अभियंता प्रशांत वाकचौरे यांना देण्यात आले आहे.