आरोग्य
…या शहरात जागतिक कॅन्सर दिनानिमीत्त मार्गदर्शन शिबीर संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या वतीने श्री साईनाथ रुग्णालयात ०४ फेब्रुवारी जागतिक कॅन्सर दिनानिमीत्त संस्थान कर्मचा-यांकरीता आयोजित करण्यात आलेल्या “कॅन्सरची सहज ओळख आणि खबरदारी” या विषयी मार्गदर्शन शिबीराचे उदघाटन संस्थानचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
भारतात कशाप्रकारे कॅन्सरचा फैलाव होत असून अशा आजारापासुन भारतीय लोकांनी कसे दुर रहावे.तसेच कॅन्सर विषयी समज गैरसमज या विषयावर ही त्यांनी शिर्डीत नुकतेच मार्गदर्शन केले आहे.
यावेळी श्री साईबाबा संस्थानचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव हे उदघाटनीय भाषणात बोलताना म्हणाले की, कॅन्सर सारख्या जीव घेणा-या आजारापासुन वाचण्यासाठी नियमीत व्यायाम,व्यसनापासुन दुर राहावे.याच बरोबर सकस आहार घेवुन आपण कॅन्सर सारख्या आजारापासुन दुर राहुन आपणच आपल्या आरोग्याची काळजी घेवु शकतो.याच बरोबर श्री साईबाबा संस्थान कर्मचा-यांचा एक कुटुंब प्रमुख म्हणुन तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी आमची आहे,तुम्ही वेळोवेळी दिलेली सर्व कामे निस्पृहपणे व मोठया उत्साहाने पार पाडत असतात.यातुन तुमच्या आरोग्याची विविध प्रश्न तयार होतात. याकरीता येणारे काळात असे मार्गदर्शनपर अनेक शिबीरे कर्मचा-यांकरीता आयोजीत करण्यात येतील. त्यामुळे कर्मचा-यांना आपले आरोग्य चांगले निरोगी ठेवणेस मदत होईल, असे सांगुन त्यांनी यावेळी श्री साईबाबा संस्थानने कर्मचा-यां विषयी चालु केलेल्या विविध उपक्रमांची माहिती ही दिली आहे.
श्री साईनाथ रुग्णालयात पार पडलेल्या या शिबीरास मुख्य मार्गदर्शक म्हणुन कॅन्सर तज्ञ डॉ.मुकुल घरोटे हे लाभले होते.यावेळी त्यांनी कॅन्सरच्या विविध प्रकारासह,कॅन्सर या आजाराची लक्षणे व त्याची सहज ओळख,त्यावरील उपचार व कॅन्सर आजारापासुन आपण आणि आपले कुटुबांचे कसा बचाव करावा या संबंधी सविस्तर मार्गदर्शन केले.भारतात कशाप्रकारे कॅन्सरचा फैलाव होत असून अशा आजारापासुन भारतीय लोकांनी कसे दुर रहावे.तसेच कॅन्सर विषयी समज गैरसमज या विषयावर ही त्यांनी मार्गदर्शन केले आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्तवीक वैद्यकीय संचालक लेफ्ट.कर्नल डॉ.शैलेश ओक यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालक श्री साईबाबा हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे व मान्यवरांचे आभार ज्यु.बायोमेडीकल इंजिनीअर कु.प्रणाली कांबळे यांनी मानले.कार्यक्रमासाठी उप वैद्यकीय संचालक,डॉ.प्रितम वडगावे,रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी,परिचारिका,परिचारक व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.