जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

महिलांच्या विकासाठी सुरक्षित वातावरणाची गरज- प्राचार्य

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

देशातील महिलांना आपला विकास साधण्यासाठी त्यांना सुरक्षित वातावरणाची गरज असल्याचे प्रतिपादन के.जे.सोमैय्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“भारत हा स्त्री शक्तीचा देश आहे.या समाजात अनेक महापुरुष हे स्त्री मार्गदर्शनामुळे घडले.राजमाता जिजाऊ,राणी लक्ष्मीबाई,क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले,रमाबाई आंबेडकर,मदर तेरेसा,सरोजिनी नायडू,इंदिरा गांधी इत्यादी अनेक कर्तृत्ववान महिलांनी या देशाचा नावलौकिक वाढविला आहे”-डॉ.बी.एक यादव,प्राचार्य,के.जे.सोमैया महाविद्यालय,कोपरगाव.

कोपरगाव येथील कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीच्या के.जे.सोमैया महाविद्यालयात महिला सबलीकरण कक्षाचे उद्घाटन,महिला सबलीकरण कक्ष व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने दि.८ ऑगस्ट रोजी महिला सबलीकरण कक्षाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी विभागाच्या प्रमुख प्रा.नीता शिंदे,डॉ.सुरेखा भिंगारदिवे,प्रा.के.देशमुख,प्रा.येवले,प्रा.गख्खड,महाविद्यालयातील प्राध्यापिका व बहुसंख्य विद्यार्थीनी उपस्थित होत्या.

सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,”भारत हा स्त्री शक्तीचा देश आहे.या समाजात अनेक महापुरुष हे स्त्री मार्गदर्शनामुळे घडले.राजमाता जिजाऊ,राणी लक्ष्मीबाई,क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले,रमाबाई आंबेडकर,मदर तेरेसा,सरोजिनी नायडू,इंदिरा गांधी इत्यादी अनेक कर्तृत्ववान महिलांनी या देशाचा नावलौकिक वाढविल्याचे त्यांनी सांगितले.समाजात महिलांना सन्मानाने जगता यावे व त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध व्हावे यासाठी महिला विषयक सर्व कायद्याचे ज्ञान त्यांना असणे आवश्यक असल्याचे त्यांनी शेवटी नमुद केले आहे.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कक्षाच्या प्रमुख प्रा.नीता शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.एस.पी.भावसार यांनी तर उपस्थितांचे आभार प्रा.वर्षा आहेर यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close