निधन वार्ता
माजी आ.पुत्र विजय रोहमारे यांचे निधन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील मूळ रहिवासी असलेले व अनेक दशकापासून पुण्यात स्थायिक झालेले व्यावसायिक व माजी आ.स्व.के.बी.रोहमारे यांचे कनिष्ठ सुपुत्र विजय कारभारी रोहमारे (वय-६५) यांचे काल पहाटेच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने पुणे आणि कोपरगाव तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होते आहे.
स्व.विजय रोहमारे यांचे मूळगाव पोहेगाव असले तरी त्यांचा अधिवास मात्र पुण्यात होता त्यामुळे इकडे सहसा त्याचा जनसंपर्क स्थापित नव्हता.ते पुण्यात गेले आणि तेथेच रमले होते.त्यांच्या पश्चात पत्नी प्रतिभाताई रोहमारे,दोन व्यावसायिक मुले असा परिवार आहे.
त्यांच्यावर पुणे येथील स्मशान भूमीत शोकाकुल वातावरणांत अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.ते कोपरगाव शहरातील कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे यांचे कनिष्ठ बंधू तर माजी जिल्हा परिषद सदस्य साईनाथ रोहमारे यांचे चुलत बंधू होते.