निधन वार्ता
संभाजी आगवन यांचे निधन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील रहिवासी व खंडकरी शेतकऱ्यांच्या आंदोलनातील जेष्ठ कार्यकर्ते संभाजी गोपाळा आगवन (वय-६७) यांचे नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात दोन मुले,तीन मुली,नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्यावर गोदावरीतीरी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
स्व.संभाजी आगवन हे राज्याचे माजी मंत्री शंकरराव कोल्हे,गोदावरी दूध संघाचे माजी अध्यक्ष स्व.नामदेवराव परजणे यांच्या गाजलेल्या खंडकरी शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.स्व.पराजणे यांचे ते निष्ठावान सहकारी मानले जात.त्यांच्या निधनाने महानंदचे अध्यक्ष राजेश परजणे,माजी उपाध्यक्ष राजेंद्र जाधव,संवत्सर ग्रामपंचायतीच्या सरपंच सुलोचना ढेपले,उपसरपंच विवेक परजणे यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.