निधन वार्ता
चंद्रभान जाधव यांचे निधन

न्यूजसेवा
माहेगाव देशमुख-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असलेले चंद्रभान बाबुराव जाधव (वय-७०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांचा पश्चात पत्नी,दोन मुले,एक मुलगी,सूना नातवंडे असा परिवार आहे.
स्व. चंद्रभान जाधव हे अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून परिसरात प्रसिद्ध होते.ते ज्ञानेश्वर व महेश जाधव यांचे ते वडील होते.त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.