निधन वार्ता
चांदगुडे यांना मातृशोक.कर्मकांडाला फाटा देत केले देहदान

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील चास (नळी) येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाहक कृष्णा चांदगुडे यांच्या मातोश्री सुगंधाबाई त्र्यंबक चांदगुडे (वय-८३) यांचे आजारपणामुळे नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात दोन मुले,दोन मुले असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होते आहे.
“स्व.सुगंधाबाई चांदगुडे यांची आदरांजली सभा दि.१२ फेब्रुवारी रोजी त्यांच्या चासनळी या गावी होणार आहे.यावेळी ‘देहदान व अवयवदान,काळाची गरज’ या विषयावर अवयवदान चळवळीचे कार्यकर्त व मुंबई येथील फेडरेशन ऑफ ऑर्गन अॅन्ड बाॅडी डोनेशनचे उपाध्यक्ष सुनील देशपांडे यांचे व्याख्यान होणार आहे”-कृष्णा चांदगुडे,कार्यवाहक,महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती.
त्यांनी मरणोत्तर देहदान केले.त्यांचा देह नाशिक येथे डाॅ.वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाला सुपूर्त करण्यात आला आहे.त्यांचे कोणतेही कर्मकांड करणार नसल्याची माहिती चांदगुडे कुटुंबानी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.विधवा प्रथा निर्मूलनाचे शासनाने परीपत्रक काढल्यानंतर महाराष्ट्रात प्रथमच सुगंधाबाई यांनी त्याची अंमलबजावणी केली होती.विधवा असुनही त्यांनी टिकली,मंगळसूत्र,जोडवे परिधान केले होते.चांदगुडे कुटुंबीयांनी याआधीही अनेक पुरोगामी निर्णय घेऊन समाजाला आदर्श घालुन दिला आहे.
स्व.सुगंधाबाई चांदगुडे यांची आदरांजली सभा दि.१२ फेब्रुवारी रोजी त्यांच्या चासनळी या गावी होणार आहे.यावेळी ‘देहदान व अवयवदान,काळाची गरज’ या विषयावर अवयवदान चळवळीचे कार्यकर्त व मुंबई येथील फेडरेशन ऑफ ऑर्गन अॅन्ड बाॅडी डोनेशनचे उपाध्यक्ष सुनील देशपांडे यांचे व्याख्यान होणार आहे.या प्रसंगी मरणोत्तर देहदानाची इच्छा असणाऱ्या व्यक्तींचे फाॅर्म भरून घेणार असल्याचे कृष्णा चांदगुडे यांनी शेवटी सांगितले आहे.