निधन वार्ता
कोपरगाव येथील दत्त पार येथील बाल ब्रम्हचारी यांचे निर्वाण

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील दत्त पार येथील बाल ब्रम्हचारी तपस्वी संत अरविंद महाराज यांचे आज वयाच्या ८५ वर्षी महानिर्वाण झाले आहे.त्यांनी कोपरगाव येथे सुमारे पन्नास वर्षांपूर्वी दत्त पार येथे आगमन करून या ठिकाणी आपले जीवन कीर्तन प्रवचन आदी मार्फत धार्मिक कार्यात व्यतीत केले होते.आपल्या हयातीत ‘शिवपुराण’ या ग्रंथाचे लेखन केले होते.त्यांच्या निर्वाणाने त्यांच्या भक्तात शोककळा पसरली आहे.
त्यांच्यावर उद्या साधू संतांच्या उपस्थितीत दुपारी ११.३० वाजेच्या सुमारास गोदावरीतिरी षोडपचारे धार्मिक संस्कार करून समाधिस्त करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या भक्त परिवाराने दिली आहे.त्यांना मानणारा मोठा भक्तपरिवार कोपरगाव,राहाता,येवला आदी परिसरात आहे.