जाहिरात-9423439946
निधन वार्ता

कोपरगाव तालुक्यातील पुरोहीत जोशी यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

संवत्सर- (वार्ताहर)

कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथील ब्राम्हण समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि परिसरातील प्रसिध्द पुरोहीत प्रकाश बाळकृष्ण जोशी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. मृत्युसमयी त्यांचे वय ६९ वर्षे होते. सायंकाळी संवत्सर येथे गोदावरी काठावरील अमरधाममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संवत्सर पंचक्रोशीतून मोठा
जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.

संवत्सर आणि आसपासच्या गांवातील साखरपुडे,लग्न सोहळे, सत्यनारायण पूजा,वास्तुशांती पूजा,मुंजी,नामकरणविधी, दशक्रियाविधी अशा विविध धर्मिक कार्यक्रमांचे पौराहित्य करण्यासाठी स्व.प्रकाश जोशी हे प्रसिद्ध होते.

कै.प्रकाश जोशी हे संवत्सर परिसरात प्रकाश गुरु या नावाने प्रचलित होते.संवत्सर व
आसपासच्या गांवातील साखरपुडे,लग्न सोहळे, सत्यनारायण पूजा,वास्तुशांती पूजा,मुंजी,
नामकरणविधी, दशक्रियाविधी अशा विविध धर्मिक कार्यक्रमांचे पौराहित्य करण्यासाठी प्रकाश
गुरुंची हजेरी अवश्य असायची. पूजाविधीसाठीचा त्यांचा अभ्यासही दांडगा होता.धार्मिक
कार्यक्रमाबरोबरच सामाजिक क्षेत्रातही त्यांनी चांगले योगदान दिलेले आहे. स्व. नामदेवराव परजणे यांचे विश्वासू सहकारी म्हणूनही त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे, संवत्सरचे उपसरपंच विवेक परजणे, ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मणराव साबळे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. कै.प्रकाश गुरु यांच्यामागे पत्नी, मुलगा निलेश, मुलगी,सुनबाई, नातवंडे असा परिवार आहे.

कै. प्रकाश जोशी ( गुरु ) यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी संवत्सर येथे गोदावरी काठावर
अंत्संस्कार करण्यात आलेत.यावेळी अनेकांनी त्यांना आदरांजली वाहिली. संवत्सर व आसपासच्या
गांवातील मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close