निधन वार्ता
बबनराव थोरात यांचे निधन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील रहिवासी व महावितरण कंपनीतील सेवा निवृत्त तारतंत्री बबनराव रेवजी थोरात (वय-७०) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आहे.यांच्या पच्छात एक भाऊ,पत्नी,दोन मुले,एक मुलगी,असा परिवार आहे.ते जवळके ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय थोरात यांचे चुलते होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होते आहे.
स्व.बबनराव थोरात हे अत्यन्त मनमिळाऊ व शांत स्वभावाचे म्हणून जवळके परिसरात परिचित होते.ते दहा वर्षा पूर्वी महावितरण कंपनीतून सेवा निवृत्त झाले होते.त्या नंतर त्यांनी विविध व्यवसायात आपले मन रमविण्याचा प्रयत्न केला होता.अलीकडील काळात प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना त्रास जाणवत होता.
त्यांना काल सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शिर्डी येथील साई संस्थानच्या रुग्णालयांत उपचारार्थ दाखल केले होते.मात्र त्या पूर्वीच त्यांची प्राण ज्योत मालवली होती.त्यांच्यावर आज सकाळी जवळके येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.