निधन वार्ता
कोपरगावातील मुख्याध्यापक लावरे यांना मातृशोक

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव येथील सुशिलामाई शंकरराव काळे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजीराव लावरे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई लावरे (वय-९०) यांचे नुकतेच वृद्धपकाळामुळे निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात तीन मुले,सुना,नातवंडे आदी परिवार आहे.त्याच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
स्व.लक्ष्मीबाई लावरे या अत्यंत धार्मिक मनमिळाऊ स्वभावाच्या म्हणून खडकेवाके ता.राहाता या परिसरात परिचित होत्या.त्यांच्या अखेरच्या काळात मुख्याध्यापक शिवाजीराव लावरे यांनी मनोभावे सेवा केली आहे.त्यांच्या निधनाने कोपरगाव व खडकेवाके परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.