निधन वार्ता
दोन दिवसात मुलगा आणि आईचे कोरोनाने निधन,संवत्सर येथील हृदयद्रावक घटना
न्यूजसेवा
संवत्सर-(शिवाजी गायकवाड)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी व येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी पतसंस्थेचे सचिव ज्ञानेश्वर चांगदेव बोरणारे (वय-५५) यांचे नुकतेच निधन कोरोनाने निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात पत्नी,एक मुलगा,दोन मुली,असा परिवार आहे.तत्पूर्वी त्यांच्या मातोश्री कमलबाई चांगदेव बोरणारे यांचे नुकतेच निधन झाले होते.दोन दिवसापूर्वीच आईच्या पाठोपाठ मुळाचेही निधन झाल्याने संवत्सर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कोपरगावसह देशभरात कोरोनाने कहर मांडला असून यात अनेकांचे बळी जात आहे.काही घरातील कर्तिमंडळी मृत्यू पावत असल्याने अनेकांचे घरसंसार उघड्यावर येत असताना दिसत आहे.अशीच दुर्दैवी घटना संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे.स्व.ज्ञानेश्वर बोरणारे यांनी विविध कार्यकारी सेवा संस्थेची सचिव पदाची जबाबदारी सांभाळताना शेतकऱ्यांना आपल्या सेवेतून आपलेसे केले होते.त्यांच्या एका मुलीचे लग्न झाले होते तर अन्य एक मुलीचे लग्न जमले होते.येत्या २० मे रोजी लग्नाचा मुहूर्त काढलेला होता.त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
स्व.बोरणारे यांच्या निधनाबद्दल जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे,गोदावरी-परजणे सहकारी तालुका दुष्ट संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,सरपंच सुलोचना ढेपले,उपसरपंच विवेक परजणे, माजी पंचायत समिती सदस्य कृष्णा परजणे आदींनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.