शैक्षणिक
…या महाविद्यालयात,’एडस् दीन’ साजरा

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील स्थानिक कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे.सोमैया वरिष्ठ महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना व जिल्हा रुग्णालय,अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिन साजरा करण्यात आला आहे.यावेळी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना रेड रिबन क्लब च्या वतीने आरोग्य विषयक प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

जगभर पसरलेल्या एड्स या जीवघेण्या रोगाबद्दल जगभर जनजागृती व्हावी आणि या रोगामुळे मरण पावलेल्यांचा शोक वक्तकार्यासाठी हा दिवस पाळावा असे आवाहन संयुक्त राष्ट्रसंघाने केले आहे.कोपरगाव येथील के.जे.सोमैया महाविद्यालय तो उत्साहात संपन्न झाला आहे.
दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो.जगभर पसरलेल्या एड्स या जीवघेण्या रोगाबद्दल जगभर जनजागृती व्हावी आणि या रोगामुळे मरण पावलेल्यांचा शोक वक्तकार्यासाठी हा दिवस पाळावा असे आवाहन संयुक्त राष्ट्रसंघाने केले आहे.सरकारी आणि आरोग्य अधिकारी,अशाशकीय संस्था आणि जगभरातील व्यक्ती एड्स प्रतिबंध आणि नियंत्रणावरील शिक्षणासह हा दिवस साजरा करतात तो कोपरगाव येथील सोमैया महाविद्यालयात नुकत्याच मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

या कार्यक्रमासाठी ग्रामीण रुग्णालय,कोपरगाव येथील आरोग्य अधिकारी डॉ.अनिल फुलवर हे मार्गदर्शक म्हणुन उपस्थित होते.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. विजय ठाणगे यांनी स्वागत मनोगतात जागतिक एड्स दिनाची पार्श्वभूमी नमूद करतांनाच विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आरोग्य सुरक्षेबरोबरच सामाजिक सुरक्षेत आपली भुमिका नोंदवून आरोग्यविषयक जनजागृती यज्ञात सहभागी होण्याचे आवाहन केले.प्रमुख मार्गदर्शक डॉ.अनिल फुलवर यांनी एड्स या आजाराबद्दल मार्गदर्शन करताना या संसर्गाचे कारण व उपाययोजना यावर आपले विचार मांडले आहेत.
राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.बी.एस.गायकवाड यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमांचा उद्देश नमूद करतांना राष्ट्रीय सेवा योजना हा विभाग आरोग्यविषयक जनजागृती शिबिरात सहभाग नोंदवित असल्याचे सांगितले.यासाठी महाविद्यालयातील रेड रिबन क्लब कार्यरत असल्याचाही उल्लेख त्यांनी केला.
सदर प्रसंगी कार्यक्रम अधिकारी डॉ.संजय दवंगे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.यावेळी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक व स्वयंसेवक,विद्यार्थी उपस्थित होते.