निधन वार्ता
माजी लेखापाल पानगव्हाणे यांना पितृशोक

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील प्रगतशील शेतकरी माधवराव दादा पानगव्हाणे (वय-९२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांचा मागे पत्नी,दोन मुले,तीन मुली,सुना,नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.ते श्री सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालयातील माजी लेखापाल रावसाहेब पानगव्हाणे यांचे पिताश्री होते.
कोपरगाव येथील श्री सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालयातील माजी लेखापाल रावसाहेब पानगव्हाणे व गोदावरी खोरे ट्रान्सपोर्ट कंपनी चे कर्मचारी दिलीप पानगव्हाणे व रमेश पानगव्हाणे यांचे ते वडील होते.त्यांच्यावर गोदावरी तीरी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.