निधन वार्ता
शैलेश साबळे यांना बंधुशोक

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील रहिवासी व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शैलेश साबळे यांचे ज्येष्ठ बंधू सचिन केशवराव साबळे (वय-40) यांचे आज दुपारी 3.45 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात दोन भाऊ,पत्नी,एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

स्व.सचिन साबळे हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून कोपरगाव शहर आणि परिसरात परिचित होते.त्यांचा कोपरगाव शहरात दूध विक्रीचा व्यवसाय होता.त्यांच्यावर कोपरगाव येथील अमरधाम येथे आज सायंकाळी 7.30 वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शैलेश साबळे यांचे ज्येष्ठ बंधू होते.राष्ट्रवादी काँग्रेसच्या नूतन नगरसेवक स्मिता शैलेश साबळे यांचे ते भाया होते.
त्यांच्या निधनाबद्दल आ.आशुतोष काळे,माजी आ.अशोक काळे,माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,नूतन नगराध्यक्ष पराग संधान आदींनी दुःख व्यक्त केले आहे.


