निधन वार्ता
पंडित वक्ते यांना बंधुशोक

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील रहीवासी व संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी पंडित नामदेव वक्ते यांचे ज्येष्ठ बंधू व प्रगतशील शेतकरी इंद्रभान नामदेव वक्ते (वय-75) यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात तीन भाऊ,दोन मुले,नातवंडे असा परिवार आहे.त्यांचेवर जेऊर कुंभारी येथील गोदावरी तिरी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

स्व.इंद्रभान वक्ते हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे म्हणून जेऊर कुंभारी आणि परिसरात परिचित होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांचे पश्चात बबन वक्ते,पंडित वक्ते,शिवाजी वक्ते आदी तीन भाऊ,तर किशोर व सुधाकर वक्ते ही दोन मुले आहेत.
स्व.इंद्रभान वक्ते हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे म्हणून जेऊर कुंभारी आणि परिसरात परिचित होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांचे पश्चात बबन वक्ते,पंडित वक्ते,शिवाजी वक्ते आदी तीन भाऊ,तर किशोर व सुधाकर वक्ते ही दोन मुले आहेत.त्यांचे निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांचे निधनाबद्दल संजीवनी समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे,माजी आ.स्नेहलता कोल्हे,सहकार महर्षी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे,कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजी वक्ते,संचालक बाळासाहेब वक्ते आदींनी दुःख व्यक्त केले आहे.



