निधन वार्ता
कारभारी सोनवणे यांचे निधन

न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील रहिवासी कारभारी काशिनाथ सोनवणे (वय-75) यांचे अल्पशा आजाराने आज दुपारी ०२ वाजून ३८ मिनिटांनी दुःखद निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात दोन मुले,चार मुली,नातवंडे असा परिवार आहे.

त्यांचा अंत्यविधी कार्यक्रम आज सायंकाळी ०७ वाजता गोदातीरी संवत्सर अमरधाम येथे होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
स्व.कारभारी सोनवणे हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे म्हणून संवत्सर आणि परिसरात परिचित होते.त्याचं ते आप्पासाहेब सोनवणे व उत्तमराव सोनवणे यांचे पिताश्री होते.



