निधन वार्ता
राष्ट्रवादीचे जिल्हा सचिव मुजगुले यांना बंधूशोक

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील मूळ रहिवासी,नाशिक येथे वास्तव्य असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय परेश चांगदेव मूजगुले (वय-64) यांचे काल दुपारी 11.30 वाजता हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात सचिन मुजगुले हे बंधू,एक बहिण,पत्नी,दोन मुली असा परिवार आहे.त्यांच्यावर आज सकाळी 11.30 वाजता पोहेगाव येथील अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

स्व.परेश मुजगूले यांचे पिताश्री सी.एस.मुजगुले यांनी अगस्तिसह राज्यातील अनेक साखर कारखान्यांची उभारणी केली होती.त्यामुळे माजी केंद्रीय मंत्री व खा.शरद पवार आणि त्यांचे जवळचे संबंध आले होते.त्यांनी ते ऋणानुबंध शेवटपर्यंत जपले पण परेश मुजगुले आणि त्यांच्या त्यांच्या पुढच्या पिढीने ते जपले होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
स्व.परेश मुजगुले हे अत्यंत मितभाषी व्यक्तिमत्व होते.त्यांचे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जवळचे संबंध होते.राज्याच्या वरिष्ठ वर्तुळात त्याचे कायम वास्तव्य होते.त्यांचे पिताश्री सी.एस.मुजगुले यांनी अगस्तिसह अनेक कारखान्यांची उभारणी केली होती.त्यामुळे माजी केंद्रीय मंत्री व खा.शरद पवार आणि त्यांचे जवळचे संबंध आले होते.त्यांनी ते ऋणानुबंध शेवटपर्यंत जपले पण त्यांच्या पुढच्या पिढीने ते जपले होते.स्व.परेश मुजगुले यांना आधी दम्याचा त्रास होता.मात्र काल त्यांना पुणे येथे असताना 11 वाजेच्या सुमारास त्रास जाणवू लागला होता.त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली आहे.त्यांच्यावर त्यांचे मूळगाव पोहेगाव येथे आज सकाळी 11.30 वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांच्या निधनाने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
त्यांच्या निधनाबद्दल माजी केंद्रीय मंत्री खा.शरद पवार,खा.सुप्रिया सुळे,राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे,माजी आ.अशोक काळे.आ.आशुतोष काळे,संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे,माजी आ.बाळासाहेब मुरकुटे,राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप वरपे आदींनी दुःख व्यक्त केले आहे.



