निधन वार्ता
माजी अध्यक्ष बोरावके यांचे निधन

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथील रहिवासी व श्री साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त पी.टी.बोरावके यांचे सुपुत्र अनिल प्रभाकर बोरावके (वय-७२) यांचे आज सकाळी ९.३० वाजता अल्पशा आजाराने पुणे येथे उपचार सुरू असताना निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी राजश्री बोरावके,एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे.त्यांच्यावर नवी पेठ,पुणे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

स्व.अनिल बोरावके यांनी हिरो होंडा कंपनीची डिलरशिप त्यांनी यशस्वीपणे सांभाळली होती.साईगंगा या शुद्ध पाण्याचा ब्रँड त्यांच्यासह कुटुंबाने राज्यात प्रसिद्ध केला होता.वडील पी.टी.बोरावके यांच्या निधनानंतर त्यांनी आपली जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली होती.ते गेली अनेक वर्षे कोपरगाव येथील प्रगत सहकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष होते.मात्र काही महिन्यापूर्वी प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे आपला राजीनामा दिला होता.
स्व.अनिल बोरावके हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे म्हणून कोपरगाव आणि पुणे भागात परिचित होते.त्यांनी महाविद्यालयीन जीवनातच परदेश वारी केली होती.त्यांचे शेतीवर नेहमी विविध प्रयोग सुरू असे.त्यातून डाळिंब,ऊस शेतीसाठी ओळखले जात.त्यांनी व्यवसायात चांगले नाव कमावले होते.हिरो होंडा कंपनीची डिलरशिप त्यांनी यशस्वीपणे सांभाळली होती.साईगंगा या शुद्ध पाण्याचा ब्रँड त्यांच्यासह कुटुंबाने राज्यात प्रसिद्ध केला होता.वडील पी.टी.बोरावके यांच्या निधनानंतर त्यांनी आपली जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली होती.ते गेली अनेक वर्षे कोपरगाव येथील प्रगत सहकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष होते.मात्र काही महिन्यापूर्वी प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे आपला राजीनामा दिला होता.
दरम्यान त्यांच्यावर आज सायंकाळी ६.३० वाजता पुणे शहरातील नवी पेठ येथील विद्युत दाहिनीत अखेरचा निरोप देण्यात आला आहे.
त्यांच्या निधनाबद्दल शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे,कोपरगावचे आ.आशुतोष काळे,गोदावरी परजणें दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,बी.एस.एन.एल.चे केंद्रीय संचालक रवींद्र बोरावके,माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील आदींनी दुःख व्यक्त केले आहे.त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.