निधन वार्ता
बापूराव पा. भाकरे यांचे निधन

न्यूजसेवा
संवत्सर (वार्ताहर)
कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथील शेतकरी व ज्येष्ठ कार्यकर्ते बापुराव देवराम भाकरे यांचे शुक्रवार रोजी रात्री ८.४५ वाजता वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते ८७ वर्षांचे होते.संवत्सर येथील अमरधामध्ये शनिवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.

- कै.बापुराव भाकरे हे शेतकरी कुटुंबातील होते.धार्मिक व मनमिळावू स्वभावाने ते संवत्सर पंचक्रोशीत परिचित होते त्यांच्या पश्चात पत्नी तसेच रामदास,सोपान,अरुण व चंद्रकांत ही चार मुले,एक मुलगी, सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
कै.बापुराव भाकरे हे शेतकरी कुटुंबातील होते.धार्मिक व मनमिळावू स्वभावाने ते संवत्सर पंचक्रोशीत परिचित होते त्यांच्या पश्चात पत्नी तसेच रामदास,सोपान,अरुण व चंद्रकांत ही चार मुले,एक मुलगी, सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्या अंत्यविधीसमयी ह. भ. प. वाल्मिक महाराज जाधव,भानुदास महाराज रोहन,दिलीप बोरनारे,संवत्सरचे उपसरपंच विवेक परजणे,यांच्यासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे व आ.आशुतोष काळे यांनी कै.बापुराव भाकरे,भाजप कार्यकर्ते आदींनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.