गुन्हे विषयक
मंदिरातील दान पेटी फोडली,कोपरगाव तालुक्यातील प्रकार

न्यूजसेवा
कुंभारी -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात पुन्हा एकदा भुरट्या चोरट्यानी डोके वर काढले असून त्यांची वक्रदृष्टी मंदिरातील दान पेटीवर पडली असून त्यास माहेगाव देशमुख दत्त मंदिरातील दान पेटी बळी पडली आहे.त्यामुळे दत्त भक्तांनी या चोरी बद्दल संताप व्यक्त केला असून या चोरट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
“यापूर्वीही चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडून दोन-तीन वेळेस दान पेटीची चोरी केली करून त्यातील रकमेचा पोबारा केला आहे.त्याबाबत वेळोवेळी तक्रार करूनही पोलिसांना चोरांचा शोध लागलेला नाही.दरम्यान या चोरीतील चोरट्यांना पोलिसांनी जेरबंद त्यांच्या मुसक्या आवळाव्या व सदर ठिकाणी चोऱ्यांना प्रतिबंध करण्यासाठी चलचित्रण व्यवस्था निर्माण करावी व या प्रकरणी आ.आशुतोष काळे यांनी लक्ष घालून या चोरट्यांचा बंदोबस्त करावा”-उल्हास काळे,माहेगाव देशमुख,भाविक.
कोपरगाव तालुक्यात चोरटे मधून अधून डोके वर काढत असून कोपरगाव शहरात सलग एका रात्रीत तीन कार चोरी गेल्याच्या घटनेचा तपास लागलेला नाही त्या शिवाय सुभद्रा नगर येथील एका नागरिकांचे सुमारे पंच्याहत्तर हजारांची चोरी झालेली आहे.त्यानंतर धोत्रे येथील शेतकरी यांच्या दोन विद्युत पंप चोरी केल्या नंतर पून्हा एकदा चोरट्यांनी आपले डोके वर काढले आहे.त्यासाठी त्यांनी आ.आशुतोष काळे यांच्या गावातील दत्त मंदिराची निवड करून थेट पोलीस यंत्रणा व राजकीय नेत्यांना आव्हान दिले आहे.त्यामुळे या चोरी नंतर पोलीस काय भूमिका घेणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.
कोपरगाव तालुक्यात माहेगाव देशमुख येथे पुरातन श्री दत्त मंदिर असून ते माहेगाव देशमुख आणि परिसरातील भाविकांचे श्रद्धा स्थान आहे.येथे येणाऱ्या भाविकांच्या संकेत दिवसेंदिवस वाढ होत आहे.सदर मंदिर हे गोदावरी नदीकाठी असल्याने त्याचे विषेश महत्व आहे.येथे दरवर्षी वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात अशी माहिती उल्हास सुखदेव काळे यांनी आमचे प्रतिनिधी गहिनीनाथ घुले यांना दिली आहे.असाच कार्यक्रम गेल्या चार दिवसापासून येथील श्री दत्त मंदिर देवस्थान माहेगाव येथे चालू असून काल रात्री दि.२० एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सभा मंडपाचे कुलूप तोडून आतील १०-१२ रुपयांच्या चीजवस्तू व भ्रमणध्वनी,रोख रक्कम आदी सामान घेऊन पोबारा केला आहे.
दरम्यान यापूर्वीही चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडून दोन-तीन वेळेस दान पेटीची चोरी केली आहे.दरम्यान त्यावेळेस किती रक्कम होती हे अंदाज कोणालाही सांगता आलेला नाही.त्याबाबत वेळोवेळी तक्रार करूनही पोलिसांना चोरांचा शोध लागलेला नाही असे ग्रामस्थांनी सांगितले आहे.दरम्यान या चोरीतील चोरट्यांना पोलिसांनी जेरबंद त्यांच्या मुसक्या आवळाव्या व सदर ठिकाणी चोऱ्यांना प्रतिबंध करण्यासाठी चलचित्रण व्यवस्था निर्माण करावी व या प्रकरणी आ.आशुतोष काळे यांनी लक्ष घालून या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी भाविकांनी शेवटी केली आहे.