निधन वार्ता
बेलगाव जवळ मोटार अपघात,एक ठार,एक जखमी

न्युजसेवा
संवत्सर – (प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नामदेवराव परजणे तालुका सहकारी दूध संघाचे कर्मचारी राजेंद्र गोविंद निकम (वय -५०) हे आपल्या मुलासहा आपल्या दुचाकीवरून संवत्सर वरून वैजापूर येथे जात असताना त्यांना एका छोट्या हत्तीने उडवले असून त्यात ते जागीच ठार झाले आहे तर त्यांचा मुलगा नितीन निकम हा गंभीर जखमी झाला असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान मयत राजेंद्र निकम यांचे शव विच्छेदन झाल्यावर त्यांच्यावर संवत्सर येथे आज सायंकाळी ०५ वाजता संवत्सर येथे गोदावरी काठी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे जवळच्या सूत्रांनी सांगितले आहे.
स्व.राजेंद्र निकम हे संवत्सर येथील लक्ष्मणवाडी येथील रहिवासी होते.ते आज सकाळी आपल्या काही कामासाठी जुना मुंबई-नागपूर मार्गाने जात असताना वैजापूर तालुक्यातील बेलगाव हद्दीत त्यांना समोरून येणाऱ्या छोटा हत्ती या वाहनाने जोराची धडक दिली होती त्यात ते जागीच ठार झाले आहे.
दरम्यान ही घटना घडल्यावर नजीकच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीस वैजापूर येथील नजीकच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते.त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राजेंद्र निकम यांना मृत घोषित केले आहे.तर जखमी मुलगा नितीन निकम यास उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.मयत निकम यांचे पश्चात आई,पत्नी,दोन मुले असा परिवार आहे.
दरम्यान मयत राजेंद्र निकम यांचे शव विच्छेदन झाल्यावर त्यांच्यावर संवत्सर येथे आज सायंकाळी ०५ वाजता संवत्सर येथे गोदावरी काठी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे जवळच्या सूत्रांनी सांगितले आहे.
या प्रकरणी वैजापूर पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केल्याची बातमी आहे.मात्र त्यास अधिकृत दुजोरा मिळाला नाही.या घटनेने संवत्सर ,लक्ष्मण वाडी परिसरात शोककळा पसरली आहे.
स्व.निकम यांचे निधनाबद्दल गोदावरी-परजणे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,संवत्सर सरपंच सुलोचना ढेपले,उपसरपंच विवेक परजणे,बाळासाहेब दहे,अभिजित भाकरे यांनी दुःख व्यक्त केले आहे.