जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
ग्रामविकास

…आम्हाला कोपरगाव तालुक्यातून वगळा,संतप्त ग्रामसभेचा ठराव मंजूर !

न्यूजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

   कोपरगाव तालुक्यातील उत्तर भारतीयांना पुण्यास जाण्यास सर्वात महत्वाचा आणि जवळचा ठरणाऱ्या तळेगाव दिघे मार्गे संगमनेर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने रांजणगाव देशमुख येथील संतापलेल्या ग्रामस्थानी आज आयोजित ग्रामसभेत आम्हाला राहाता अथवा संगमनेर तालुक्यात सवाविष्ट करावे असा ग्रामसभेचा ठराव मंजूर केल्याने कोपरगावसह नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पुण्याला जाण्यास सर्वात जवळचा ठरणारा झगडेफाटा ते वडगाव पान या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली असून या मार्गावर दर महिन्याला २०-२५ अपघात होऊन अनेक जणांचे बळी जात आहे.यातील वाहनांचे नुकसानीची मोजदाद नाही.कोपरगाव तालुक्यातील नेते याबाबत आपले तोंड उघडायला तयार नाही.उघडले तर ते केवळ औपचारिकता पूर्ण करण्यासाठी त्यामुळे या मार्गावरील रांजणगाव देशमुखसह जवळके,शहापूर,पोहेगाव,बहादरबाद,अंजनापूर,धोंडेवाडी,वेस,सोयगाव,बहादरपूर, मनेगाव,काकडी,मल्हारवाडी आदी गावांत अच्छा-खांसा संताप आहे.

   याबाबत सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यातील उत्तर भारतीयांना पुण्यास जाण्यास सर्वात महत्वाचा आणि जवळचा ठरणाऱ्या तळेगाव दिघे मार्गे संगमनेर रस्त्याची एक वर्षाच्या आत वाट लागली असून अधिकाऱ्यांनी दुसऱ्या थरात सदर रस्त्याचे काम चांगले होईल अशी केलेली बतावणी आता मोठी थाप ठरली असल्याचे उघड झाले असताना व त्याची मागीलवर्षी पहिल्याच पावसात फज्जा उडाला होता.त्यावर खर्च झालेले १० कोटी रुपये पाण्यात गेल्याची चर्चा माध्यमात होऊन त्याची बातमी ताजी असताना गत पावसाळा संपल्यावर दिवाळी झाल्यावर झगडे फाट्याजवळ सुमारे दोनशे मीटर काम खराब झाले होते.त्या ठिकाणी खड्ड्यांचा महापूर आला होता.परिणामी त्या ठिकाणी असलेले २५० मीटर काम करणे व संगमनेर हद्दी जवळ भागवतवाडी जवळ खराब झालेले सुमारे एक कि.मी. काम करण्यासाठी सरकारच्या बांधकाम विभागाने पुन्हा  जवळपास एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता.त्यातील २५० मीटरचे झगडेफाटा येथील उड्डाण पुलाच्या लागून नैऋत्येस असलेले काम दिवाळी नंतर सुरू केले होते. त्यातील सगंमनेर तालुक्यातील भागवतवाडी नाजिक् असलेले काम सुरू केलेले नाही.यातील झगडेफाटा येथील काम पहिल्या कामासारखेच उद्ध्वस्त झाले असल्याचे निदर्शनास आले होते.सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदारावर कुठलीही कारवाई केली नाही.उलट राजकीय नेत्यांनी त्यास पाठबळ पुरवले असल्याची ग्रामस्थांत जोरदार चर्चा आहे.त्यामुळे हा रस्ता पृथ्वीवरील नरक बनला असल्याचे मानले जात आहे.

श्री साईबाबांच्या शिर्डीला जाण्यासाठी जवळचा ठरणाऱ्या सायाळे मार्गे पालखी रस्त्याला एक छदाम  निधी दिला नाही.या उलट हा निधी नांदूर शिंगोटे मार्गे आपल्या स्वतःच्या संस्थांनाकडे वळवला आहे.त्यामुळे झगडेफाटा ते वडगाव पान या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली असून या मार्गावर दर महिन्याला २०-२५ अपघात होऊन अनेक जणांचे बळी जात आहे.यातील वाहनांचे नुकसानीची मोजदाद नाही.तरीही एकही नेता याकडे लक्ष द्यायला तयार नाही हे विशेष !त्यामुळे या ग्रामसभेच्या ठरावाला महत्व आले आहे.

   आधीच या भागातील दुष्काळी ०७ तालुक्यातील १८२ गावांवर प्रस्थापित नेत्यांनी निळवंडे धरणाचे शेतीला पाणी देण्यास गेली ५५ वर्षे सातत्याने अन्याय केला आहे.त्या आधी उजनीचा बोऱ्या वाजवला होता.मात्र निळवंडे कालवा कृती समितीने नानासाहेब जवरे,विक्रांत रूपेंद्र काले यांचे माध्यमातून उच्च न्यायालयात ॲड.अजित काळे यांचे माध्यमातून जनहित याचिका लढवून,रस्त्यावरील संघर्ष करून,अनेक गुन्हे अंगावर घेत हा लढा गेली १५-१६ वर्षे सातत्याने लढून सर्वोच्च व उच्च न्यायालयातून कालव्यांचे पाणी मिळवून दिले आहे.राज्य सरकारने आगामी काळातील सिंहस्थ कुंभ मेळ्यासाठी जवळपास ३० हजार कोटी रुपयांची तरतूद केली मात्र उत्तर नगर जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी मात्र शिर्डीला संलग्न रस्त्यांना किंवा गर्दीच्या काळात ज्या रस्त्यावरील अवजड वाहतूक २० वर्षे ज्या झगडे फाटा ते वडगाव पान फाटा मार्गे वळविण्यात आली त्या रस्त्याला एक छदाम  निधी दिला नाही.या उलट हा निधी नांदूर शिंगोटे मार्गे आपल्या स्वतःच्या संस्थांनाकडे वळवला आहे.त्यामुळे झगडेफाटा ते वडगाव पान या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली असून या मार्गावर दर महिन्याला २०-२५ अपघात होऊन अनेक जणांचे बळी जात आहे.यातील वाहनांचे नुकसानीची मोजदाद नाही.

दरम्यान सदर ग्रामसभेत रांजणगाव देशमुख हे गाव संगमनेर किंवा राहाता तालुक्यात समाविष्ट करणे बाबत २१ विरुद्ध ०५ मते पडून ठराव बहुमताने मंजूर झाला असल्याची माहिती तेथील कार्यकर्ते संदीप तात्याभाऊ गोरडे यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली आहे.मात्र आमच्या प्रतिनिधीने याबाबत महिला सरपंच जी.ग.मते यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी त्यास नकार दिला असून सदर ठराव मंजूर करतेवेळी ११९ ग्रामस्थ तटस्थ राहिले असून  २१ जणांनी हात वर केले तर ०५ जणांनी तो फेटाळला असल्याचे सांगितल्याने ग्रामस्थांत संभ्रम निर्माण झाला आहे.

  दरम्यान कोपरगाव तालुक्यातील नेते याबाबत आपले तोंड उघडायला तयार नाही.उघडले तर ते केवळ औपचारिकता पूर्ण करण्यासाठी त्यामुळे या मार्गावरील रांजणगाव देशमुख,जवळके,शहापूर,पोहेगाव,बहादरबाद,अंजनापूर,धोंडेवाडी,वेस,सोयगाव,बहादरपूर, मनेगाव,काकडी,मल्हारवाडी आदी गावांत अच्छा-खांसा संताप आहे.अनेक कार्यकर्त्यांनी उत्तर नगर जिल्ह्यातील पुढाऱ्यांच्या आणि विशेषता कोपरगाव तालुक्यातील नेत्यांच्या विरोधात निषेधात्मक आंदोलन म्हणून खड्ड्यात “सत्यनारायण पूजा” केली,कोणी रस्त्यात झाडे लावली,कोणी होड्या सोडल्या,कोणी “रास्ता रोको” तर कोणी रस्त्यावरील खड्ड्यात चुली पेटवून ॲड.योगेश खालकर आदींनी आंदोलन केले.मात्र नेते आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग यायला तयार नाही.

निळवंडेच्या लाभक्षेत्रातील दुष्काळी १८२ गावांचे पिण्याचे पाण्याचे आरक्षण ग्रामस्थ मागत असताना नेत्यांच्या कानावरील माशी उठत नाही.मात्र लाभक्षेत्राबाहेरील गोदावरी कालव्यांच्या बारामाही पाणी मिळणाऱ्या शहरात लगेच पाणी मंजूर होते हे आक्रित जनतेच्या लक्षात आले आहे.परिणामी या आंधळ्या आणि बहिऱ्या नेत्यांच्या आणि सरकारच्या विरुद्ध सर्वप्रथम रांजणगाव देशमुख येथील ग्रामसभेने बंडाचा झेंडा उभारला आहे.यामुळे याकडे नगर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

  दरम्यान अशीच अवस्था साईबाबा पालख्यांना सर्वात जवळचा ठरणारा नाशिक-शिर्डी या पालखी रस्त्याची आहे.जवळके-सायाळे मार्ग शिर्डीसाठी सर्वात जवळचा असताना सिंहस्थ कुंभमेळ्यात एक फुटकी कवडीची आर्थिक तरतूद झाली नाही.निळवंडेच्या लाभक्षेत्रातील दुष्काळी १८२ गावांचे पिण्याचे पाण्याचे आरक्षण ग्रामस्थ मागत असताना नेत्यांच्या कानावरील माशी उठत नाही.मात्र लाभक्षेत्राबाहेरील शहरात लगेच पाणी मंजूर होते हे आक्रित जनतेच्या लक्षात आले आहे.परिणामी या आंधळ्या आणि बहिऱ्या नेत्यांच्या आणि सरकारच्या विरुद्ध सर्वप्रथम रांजणगाव देशमुख येथील ग्रामसभेने बंडाचा झेंडा उभारला आहे.व आजच्या संपन्न झालेल्या ग्रामसभेत अजेंड्यावरील विषय क्रमांक ०६ द्वारे रांजणगाव देशमुख गाव कोपरगाव तालुक्यातून वगळून संगमनेर अथवा राहाता तालुक्यात साविष्ट करावे अशी मागणी येथील युवा कार्यकर्ते सुनील गणपत वर्पे दि.१८ ऑगस्ट रोजी करून तो ठराव आज ग्रामसभेत मंजूर केल्याची माहिती दिली आहे.त्यामुळे सत्ताधाऱ्यांविरोधात ग्रामस्थ एकवटले असल्याचे दिसू लागले आहे.त्यामुळे आता तरी कोपरगाव तालुक्यातील नेते आणि पालकमंत्री जागे होणार का असा सवाल निर्माण झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close