निधन वार्ता
परिगाबाई जोंधळे यांचे निधन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
निळवंडे कालवा कृती समितीचे ५३ वर्ष अपूर्ण ठेवलेल्या निळवंडे प्रकल्पाच्या लढ्यात आपले अपूर्व योगदान असलेले जेष्ठ नेते व उपसंघटक उत्तमराव (नाना)जोंधळे यांच्या धर्मपत्नी सौ.परिगाबाई उत्तमराव जोंधळे (वय-६०) यांचे प्रदीर्घ आजाराने नुकतेच निधन झाले आहे.त्यांचा अंत्यविधी आज मंगळवार दि.१० ऑक्टोबर रोजी सकाळी १०.१५ वाजता कौठे-कमळेश्वर ता.संगमनेर येथे अमरधाम येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे.त्यांच्या पश्चात पती,तीन मुले,एक मुलगी असा परिवार आहे.

स्व.परिगाबाई जोंधळे या अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाच्या म्हणून परिसरात प्रसिद्ध होत्या.त्यांनी उत्तमराव जोंधळे यांच्या सामाजिक लढ्यात पडद्यामागून मोठी साथ दिली होती.त्यांचे माहेर हिवरगाव पावसा येथील होते.त्या माजी सरपंच सोपानराव जोंधळे यांच्या भावजयी होत्या.
स्व.परिगाबाई जोंधळे या अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाच्या म्हणून परिसरात प्रसिद्ध होत्या.त्यांनी उत्तमराव जोंधळे यांच्या सामाजिक लढ्यात पडद्यामागून मोठी साथ दिली होती.त्यांचे माहेर हिवरगाव पावसा येथील होते.
त्यांच्या निधनाबद्दल शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे,निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले,कार्याध्यक्ष मच्छीन्द्र दिघे,गंगाधर रहाणे,उपाध्यक्ष संजय गुंजाळ,सोन्याबापू उऱ्हे,सचिव-कैलास गव्हाणे,संघटक-नानासाहेब गाढवे,संदेश देशमुख,व सुधाकर शिंदे,वामनराव शिंदे,दत्तात्रय चौधरी,कौसर सय्यद,विठ्लराव देशमुख,अशोक गांडोळे,संतोष तारगे,बाबासाहेब गव्हाणे,भास्कर गव्हाणे,रंगनाथ गव्हाणे,ऍड.योगेश खालकर,भाऊसाहेब गव्हाणे,संतोष गाढे,माधव गव्हाणे,रामनाथ ढमाले सर,तानाजी शिंदे,ज्ञानदेव शिंदे गुरुजी,दौलत दिघे,आप्पासाहेब कोल्हे,सचिन मोमले,महेश लहारे,रावसाहेब मासाळ,सोमनाथ दरंदले,वाल्मिक नेहे,नामदेव दिघे,पाटीलबा दिघे,संतोष गाढवे,शरद गोर्डे,दत्तात्रय आहेर,शिवनाथ आहेर,गोरक्षनाथ शिंदे,दत्तात्रय थोरात आदींनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.त्यांच्या अंत्यसमयी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.