जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अपघात

…’त्या’धडकेत आठ जखमी,चालकाविरुद्ध गुन्हा

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव (प्रतिनिधी)

   कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आपल्या ताब्यातील राज्य परिवहन मंडळाची वैजापूर आगाराची बस रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवून समोर असलेल्या कंतेनरला जोराची धडक दिल्याने त्या बस मधील वैजापूर,शिर्डी आदी ठिकाणच्या आठ प्रवाशी गंभीर जखमी केल्या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी चालक कल्याण बिसंन शहरे (चालक क्रमांक २१०३७)याचे विरुध्द फिर्यादी वाहक अमोल बापूराव घाडगे (वय -३८) रा.रामगिरीनगर यांनी गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

  

दरम्यान या बस मधील प्रवासी सुनीता सचिन लूनावत,(वय-४०),सुमन कारभारी पठारे,(वय-७५),आरती कारभारी पठारे (वय -२२),सर्व रा.वैजापूर,आशा विलास गायकवाड वय ७५), शिवराई,आशाबाई रामदास राजपूत (वय -६५),मंदा दिलीप राजपूत (वय -६५) दोघी रा.शिर्डी,शांताबाई भागवत डेंगळे (वय -८०) कांताबाई भागवत डेंगळे (वय -६०) दोघी रा.निमगाव जाळी,व चालक आदी आठ जण गंभीर जखमी झाले आहे.

  सदरचे सविस्तर वृत्त असे की,वर्तमानात कोपरगाव शिर्डीला जोडणारा सावळीविहीर ते कोपरगाव या रस्त्याचे केंद्रीय रस्ते विकास निधीतून १९१ कोटी रुपयांचे काँक्रीटीकरण काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे.परिणाम स्वरूप अनेक ठिकाणी रस्ता वाहतूक वळवून एकेरी केली जात आहे.त्यामुळे अनेक वाहने अपघातग्रस्त होत आहे.यात विक्रमी पातळीवर संख्या वाढली आहे.त्यामुळे अनेक जीव हकनाक बळी जात आहे.तर काही घटना त चालक तयार चांगल्या रस्त्यावर भरधाव वाहने चालवून अनेकांच्या जीवितास धोका निर्माण करताना दिसत आहे.अशीच घटना रविवार दि.२२ डिसेंबर रोजी दुपारी १.४५ वाजता घडली असून यातील राज्य परिवहन मंडळाची वैजापूर बस आगाराची बस (क्रमांक एम.एच.२० बी.एल.१८९३) शिर्डिकडून भरधाव वेगाने येत असताना व पुढे एक तामिळनाडू राज्यातील मालवाहू ट्रक (क्रमांक टी.एन.३४ डबल्यू २४५३) असताना तिला कातकडे पेट्रोल पंपासमोर असलेल्या उतारावर बस वरील नियंत्रण सुटल्याने जोराची धडक दिली आहे.सदरची धडक इतकी जोराची होती की सदर बसचा चालकाच्या बाजूची पुढील बाजू मोठ्या प्रमाणावर क्षतिग्रस्त झाली असून सदर बसच्या चालकाच्या बाजूचा जवळपास तीस टक्के भाग तोडून टाकला आहे.त्यात मालवाहतूक बसचे मोठे नुकसान झाले आहे.त्यामुळे बस चालक कल्याण शहरे यासह बस मधील प्रवासी सुनीता सचिन लूनावत,(वय-४०),सुमन कारभारी पठारे,(वय-७५),आरती कारभारी पठारे (वय -२२),सर्व रा.वैजापूर,आशा विलास गायकवाड वय ७५), शिवराई,आशाबाई रामदास राजपूत (वय -६५),मंदा दिलीप राजपूत (वय -६५) दोघी रा.शिर्डी,शांताबाई भागवत डेंगळे (वय -८०) कांताबाई भागवत डेंगळे (वय -६०) दोघी रा.निमगाव जाळी,आदी आठ जण गंभीर जखमी झाले आहे.त्यांना नजीकच्या श्री जनार्दन स्वामी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते.उपचारानंतर हा गुन्हा दखल केला असून घटनास्थळी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांचेसह पो.हे.को.बी.एस.कोरेकर यांनी भेट दिली आहे.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१,१२५(आ)(ब) मोटार वाहन कायदा कलम १८४,१७७ प्रमाणे आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक मथुरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.कोरेकर हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close