जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

दुष्काळी शेतकऱ्यांचे…या उमेदवारासाठी निधी संकलन !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)


    शिर्डी लोकसभा मतदार संघाची निवडणूक आगामी १३ मे रोजी संपन्न होत आहे.त्यासाठी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी आपला प्रचार सुरु केला असून यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे हे अपवाद नाही.त्यांनी दुष्काळी भागात आपला प्रचाराचा नारळ नुकताच रांजणगाव देशमुख व वेस-सोयगाव आदी ठिकाणी फोडला असून त्यांना येथील गावकऱ्यांनी निळवंडे प्रकल्पाच्या केंद्रीय जल आयोगाच्या सतरा मान्यता पैकी तेरा मान्यता मिळवून दिल्या बद्दल लोकवर्गणी जमा करून ती माजी खा.वाकचौरे यांचेकडे सुपूर्त केली असल्याने याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे निधी संकलन करताना दुष्काळी शेतकरी दिसत आहे.

  

  सन-२००९ साली तत्कालीन उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे हे शिर्डी लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यावर त्यांनी हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्याकडे निधी नसल्याने केंद्राकडे सुरु असलेल्या,’वेग वर्धित सिंचन प्रकल्पाकडे (ए.आय.बी.पी.) या योजनेतुन १७ पैकी १४ मान्यता मिळवल्या होत्या व उर्वरित मान्यता निळवंडे कालवा कृती समितीने उच्च न्यायालयाच्या माध्यमातून मिळवून निधी मिळण्याचा मार्ग प्रशस्त केला होता.त्यामुळे गतवर्षी ३१ मे रोजी डाव्या कालव्यांची व नंतर जून महिन्यात उजव्या कालव्यांची चाचणी पूर्ण केली आहे.


  शिर्डी लोकसभा मतदार संघाचे महाघाडीचे उमेदवार माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचे नामनिर्देशन माजी मंत्री आदित्य ठाकरे,माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,आ.लहू कानडे,आ.शंकरराव गडाख आदींच्या प्रमुख उपस्थित भरल्यानंतर पहिल्याच दिवशी प्रचाराचा नारळ कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख व वेस-सोयगाव येथील हनुमान मंदिरात फोडण्यात आला त्यावेळी हि घटना उघड झाली आहे.

कोपरगाव तालुक्यातील वेस-सोयगाव येथे निधी संकलन करताना दुष्काळी शेतकरी दिसत आहे.

 

वर्तमानात ज्यांनी आपल्या दहा वर्षाच्या कालखंडात माजी खा.सदाशिव लोखंडे यांनी एक रुपया केंद्रातून आणला नाही ते श्रेय घेण्यासाठी केविलवाणी धडपड करत आहे.हि बाब निंदनीय आहे.त्या प्रवृत्तीस काही स्वार्थी लोक पाठीशी घालत आहे.त्यांना उघड करण्याची हि वेळ असल्याने १८२ गावातील दुष्काळी जनतेने हि निवडणूक हाती घेतली आहे.

 

  कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे मार्गदर्शन करताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे दिसत आहे.

  सदर प्रसंगी सेनेचे कालवा कृती समितीचे कार्यकर्ते व सेनेचे माजी तालुका उपाध्यक्ष गंगाधर रहाणे,संजय गुंजाळ,कौसर सय्यद,गोपीनाथ घोरपडे,समितीचे माजी अध्यक्ष गंगाधर गमे,राजेंद्र निर्मळ,ज्ञानेश्वर वर्पे,रंगनाथ गव्हाणे,ऍड.रमेश गव्हाणे,सुधाकर गाढवे,पाटपाणी समितीचे उपाध्यक्ष उत्तमराव घोरपडे,रवींद्र वर्पे,कैलास गव्हाणे,महेंद्र सोनवणे,बाळासाहेब सोनवणे,नरहरी पाचोरे,आप्पासाहेब कोल्हे,सुधाकर गाढवे,प्रवीण कोल्हे,मोहंमद इनामदार,चंद्रकांत पाडेकर,दशरथ पाडेकर,हौशीराम पाडेकर,विलास कोल्हे,दत्तात्रय कोल्हे,भानुदास कोल्हे,विजय गोर्डे,सुनील कोल्हे,अभिजित कोल्हे,सतीश म्हाळसकर,देवचंद खामकर,जालिंदर बडे,नामदेव म्हाळसकर,काशिनाथ पाडेकर,शकील इनामदार,शाहरुख सय्यद,राजू इनामदार,गनिभाई सय्यद,राजेंद्र कोल्हे,गणेश कोल्हे,रमजानस सय्यद,रामदास भडांगे आदीसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

   सदर प्रसंगी कौसर सय्यद यांनी म्हटले आहे की,”निळवंडे प्रकल्प हा गत ५४ वर्षांपासून रखडला होता.मात्र निळवंडे कालवा कृती समितीने हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पत्रकार नानासाहेब जवरे यांच्या नेतृत्वात कागदपत्रिय काम सुरु केल्यावर त्यास गती आली आहे.सन-२००९ साली तत्कालीन उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे हे शिर्डी लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यावर त्यांनी हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्याकडे निधी नसल्याने केंद्राकडे सुरु असलेल्या,’वेग वर्धित सिंचन प्रकल्पाकडे (ए.आय.बी.पी.) या योजनेकडे त्यांचे लक्ष वेधून घेतले होते.त्यावेळी राज्य सरकार कर्जात बुडालेले असल्याने अर्धवट जलसिंचन योजना पूर्ण करण्यासाठी या प्रकल्पास केंद्र सरकारकडून ९० टक्के निधी मिळत होता.तर राज्याचा १० टक्के हिस्सा होता.त्यासाठी केंद्रीय जल आयोगाच्या १७ मान्यता मिळवणे आवश्यक होते.त्यासाठी कालवा कृती समितीने पाठपुरावा सुरु करून खा.वाकचौरे यांच्या माध्यमातून सन-२०१४ पर्यंत १४ मान्यता मिळवल्या होत्या.मात्र उर्वरित ०३ मान्यता राज्य सरकार स्थानिक उत्तर नगर जिल्ह्यातील नेत्यांच्या दबावाने देत नव्हते.त्यासाठी निळवंडे कालवा कृती समितीने उच्च न्यायालयात रुपेंद्र काले व पत्रकार नानासाहेब जवरे यांच्या नावाने अड्.अजित काळे यांच्या सहकार्याने जनहीत याचिका ( क्रं.१३३/२०१६) सप्टेंबर २०१६ मध्ये दाखल करून मिळवल्या होत्या.मात्र त्या जल आयोगाच्या मान्यता अहंम ठरल्याने व त्याची सर्व कागदपत्रे कालवा समितीने दाखल केल्याने उच्च न्यायालयाने त्या संबंधी केंद्र व राज्य सरकारला जाब विचारला होता.व मार्च २०१७ साली प्रतिज्ञापत्र दाखल करून सदर प्रकल्प ऑक्टोबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे अभिवचन दिले होते.मार्च २०१९ मध्ये आदेश देऊनही जलसंपदा विभाग अकोले तालुक्यातील कालव्याचे काम सुरु करत नव्हते.त्यासाठी तळेगाव दिघे येथे समितीने मोठे,’रास्ता रोको’ आंदोलन केले होते.दरम्यान त्यासाठी तत्कालीन औरंगाबाद उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केल्यावर जलसंपदा विभाग ठिकाणावर आला होता.व सुमारे २५० पोलीसांचे बळ घेऊन सदर काम सुरु केले होते.सहा मुद्तवाढी दिल्यावर उच्च न्यायालयाच्या आदेशानेच डावा उजव्या या दोन्ही कालव्याच्या पाण्याच्या चाचण्या मे व जून महिन्यात पूर्ण झाल्या आहेत.यात स्थानिक नेत्यांचा दुरान्वयाने संबंध नाही.त्यामुळे खा.वाकचौरे यांचे मोठे योगदान राहिले आहे.मात्र वर्तमानात ज्यांनी आपल्या दहा वर्षाच्या कालखंडात माजी खा.सदाशिव लोखंडे यांनी एक रुपया केंद्रातून आणला नाही ते श्रेय घेण्यासाठी केविलवाणी धडपड करत आहे.हि बाब निंदनीय आहे.त्या प्रवृत्तीस काही स्वार्थी लोक पाठीशी घालत आहे.त्यांना उघड करण्याची हि वेळ असल्याने १८२ गावातील दुष्काळी जनतेने हि निवडणूक हाती घेतली आहे.त्यातून हा निधी दुष्काळी शेतकऱ्यांनी जमा केला असल्याचे कौसर सय्यद यांनी शेवटी सांगितले आहे.या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close