जाहिरात-9423439946
पुरस्कार,गौरव

कोपरगाव तालुक्यातील युवा अभियंत्यांचा इस्रोत गौरव !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

केरळ येथील वलीयामाला येथे भारतीय अंतराळ संस्थेच्या वतीने नुकत्याच संपन्न झालेल्या,’गुणवत्ता दिना’ निमित्त गोदरेज कंपनीचे मुख्य गुणवत्ता नियंत्रक अमोल बन्सी थोरात यांना इस्रोच्या शास्रज्ञासमोर मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यांच्या या यशाबद्दल त्यांची मातृभूमी जवळकेसह कोपरगाव तालुक्यात व अ.नगर जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

  इस्रोचे लिक्विड प्रपल्शन सिस्टीम सेंटरचे (एल.पी.एस.सी.) संचालक डॉ.व्ही.नारायण यांचे समवेत गोदरेज कंपनीचे मुख्य गुणवत्ता नियंत्रक अमोल थोरात दिसत आहे.

इस्रोच्या वतीने केरळ येथील वलीयामाला येथे ‘जागतिक गुणवत्ता सप्ताह’ नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला.त्यावेळी गोदरेज कंपनीचे मुख्य गुणवत्ता नियंत्रक तथा प्रकल्प संचालक अमोल थोरात यांना निमंत्रीत केले होते त्यावेळी त्यांना उपस्थित तज्ञासमोर बोलण्याची संधी मिळाली होती.

‘जागतिक गुणवत्ता दिन’ नोव्हेंबरमध्ये दर दुसऱ्या गुरुवारी साजरा केला जातो.२०२३ मध्ये,०९ नोव्हेंबर हा दिवस संपन्न झाला आहे.या दिवसाचे उद्दिष्ट जगभरात गुणवत्ता जागरुकता वाढवणे,तसेच व्यक्तींच्या आर्थिक समृद्धीला समर्थन देणे हे आहे.०९ नोव्हेंबर २०२३ दरम्यान इस्रोच्या वतीने केरळ येथील वलीयामाला येथे ‘जागतिक गुणवत्ता सप्ताह’ नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.त्यावेळी गोदरेज कंपनीचे मुख्य गुणवत्ता नियंत्रक तथा प्रकल्प संचालक श्रीमती कल्पना के.व अमोल थोरात यांना निमंत्रीत केले होते त्यावेळी त्यांना उपस्थित तज्ञासमोर बोलण्याची संधी मिळाली होती.

    सदर प्रसंगी रॉकेट बनवताना आवश्यक असणाऱ्या लिक्विड प्रपल्शन सिस्टीम सेंटरचे (एल.पी.एस.सी.) संचालक डॉ.व्ही.नारायण,चंद्रयानाचे प्रकल्प संचालक डॉ.विरा मुत्थुवेल,यू.आर.एस.सी.असोसियट प्रकल्प संचालक श्रीमती कल्पना के.गोदरेज कंपनीचे अवकाश विभागाचे गुणवत्ता प्रमुख अमोल थोरात आदींना निमंत्रित केले होते.

सदर प्रसंगी अमोल थोरात यांनी लिक्विड प्रपल्शन सिस्टीम या रॉकेट बनवताना आवश्यक असणाऱ्या आधुनिक गुणवत्ता व कार्यपद्धती बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे.त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले आहे.थोरात हे अ.नगर जिल्ह्यातील व कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील रहिवासी असून नगर जिल्हा बँकेचे निमगाव जाळी येथील माजी व्यवस्थापक बन्सी थोरात यांचे चिरंजीव आहेत.त्यांनी आपले शिक्षण मेकॅनिकल इंजिनियर म्हणून आपली कारकीर्द गोदरेज या कंपनीत सुरु करून हे यशोशिखर गाठले आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

सदर प्रसंगी डॉ.व्ही.नारायण  आणि उपस्थित व्याख्येते यांचा सत्कार करून गौरव केला व उपस्थितांचे आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close