नगर जिल्हा
राहाता पालिका कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ-मुख्याधिकाऱ्यांवर केला आरोप
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
केवळ मुख्याधिका-यांच्या मनमानी कारभारामुळे सफाई कामगारांचे गेल्या ४ महिन्यांपासुन पगारबील न दिल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याचा आरोप करत राहाता नगरपालिकेच्या नगराध्यक्षा ममता पिपाडा भाजप नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी कोपरगाव नगरपरिषदेसमोर नुकतेच धरणे आंदोलन केल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
नगराध्यक्षा ममता पिपाडा यांनी आंदोलन केल्यानंतर नगरविकास विभागाचे प्रधान सचिव श्री.पाठक यांचेकडे मुख्याधिकारी सरोदे यांच्या अकार्यक्षम काराभाराविषयी तक्रार केल्यानंतर त्यांच्याकडुन तातडीने राहाता नगरपालिकेचा कार्यभार काढुन देवळाली नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अजित निकत यांच्याकडे देण्यात आला असल्याचा दावा केला असला तरी त्यात तथ्य दिसत नाही हा निव्वळ योगायोग मानला जात असून असे असते तर पिपाडा पती-पत्नी यांनी एक दिवसासाठी आंदोलन का केले ? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
या आंदोलनास कोपरगाव नगरपरिषद येथे गटनेते विजय सदाफळ,आरोग्य सभापती सलीम शहा,सचिन मेहेत्रे आदींनी येवुन पाठिंबा दिला.
राहाता नगरपालिकेचा अतिरिक्त कारभार असलेले प्रशांत सरोदे यांनी मनमानी कारभार करुन राहाता नगरपालिकेच्या सफाई कामगारांचे पगार बील न दिल्यामुळे त्या कामगारांवर उपासमारीची वेळ आल्यामुळे ते कामबंद आंदोलन करण्याच्या तयारीत होते.या कामगारांची व्यथा ऐकुण नगराध्यक्षा ममता पिपाडा यांनी मंत्रालयात जावुन नगरविकास मंत्र्यांची भेट घेवुन तातडीने सफाई कामगारांचे पगार करावे याची मागणी केली होती. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात वारंवार जावुन नगराध्यक्षा ममता पिपाडा व डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी पाठपुरावा केला. याबाबत त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन वारंवार सुचना देखील करण्यात आल्या परंतु मुख्याधिकारी सरोदे यांनी टाळाटाळ केली. कामगारांच्या भावना जाणुन न घेता केवळ मनमानी कारभार केल्यामुळे या कामगारांवर आज उपासमारीची वेळ आल्याचा त्यांनी आरोप केला आहे.
दरम्यान राहाता नगरपरिषदेत पाणी पुरवठ्याच्या मोटारी नादुरुस्त नावाखाली अतार्किक व अव्यवहार्य बिले काढण्याचा सपाटा लावल्याने मुख्याधिकाऱ्यांनी हि बिले काढण्यास नकार दिल्याची विश्वसनिय माहिती हाती आली आहे.व हि बिले नागरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांची नसून ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांची असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
यावेळी नगराध्यक्षा ममता पिपाडा म्हणाल्या की,” मुख्याधिकारी यांनी कामगारांचा एवढा अंत पाहु नये. गेल्या चार महिन्यापासुन पगारबील थकलेले आहे. याबाबत आम्ही वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करत आहोत. या कामगारांना न्याय मिळुन देण्यासाठी आम्ही याठिकाणी धरणे आंदोलन केले”. यावेळी राजेंद्र पिपाडा यांनीही या सफाई कामगारांनी व्यथा मांडली.विशेष म्हणजे या पगारबीला प्रमाणे मुख्याधिकारी सरोदे यांनी पाणीपुरवठा,वीज साहित्य तसेच इतर आत्यावशक सेवा साहित्य खरेदी न केल्याने विस्कळीत झाल्या आहे. याला केवळ मुख्याधिकारी सरोदे यांचा बेजबाबदारपणामुळे आरोग्य विभागाची वाहने दुरुस्ती अभावी उभी असल्यामुळे संपुर्ण शहरात आरोग्याचा बोजवारा उडाला आहे या सर्व प्रकाराला मुख्याधिकारीच कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
धरणे आंदोलन चालु असताना मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी नगराध्यक्षा ममता पिपाडा व डॉ.राजेंद्र पिपाडा यांची भेट घेवुन सफाई कामगारांचे पगार काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले.