जाहिरात-9423439946
संपादक-नानासाहेब जवरे
श्रीरामपूर(प्रतिनिधी)
महिलांच्या वेदना जेंव्हा पुरुष सहवेदना म्हणून समजून घेतील तेव्हाच संस्काराचे मंदिरे उभे राहतील,ज्यांना कळत नाही महिलांचे दर्द, त्यांना कसे म्हणायचे मर्द,महिलांनी आता अन्याय अत्याचार दुःखात रडत बसण्यापेक्षा स्वसंरक्षणासाठी सिद्ध झाले पाहिजे असे प्रतिपादन पत्रकार व वात्रटिकाकार नवनाथ कुताळ यांनी केले आहे.
आपलं संरक्षण पोलीस करेल,सरकार करेल याचा विचार न करता आपले संरक्षण आपण स्वतः करायला सिद्ध व्हावे.सामाजिक विकृती दूर करण्यासाठी व सुसंस्कृत समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. त्याची मुर्तमेढ आपल्या कुटुंबापासून रोवली पाहिजे.टीव्ही वरच्या सामाजिक विकृती बिंबवणाऱ्या मालिका आणि मोबाईल वापराचा स्वैराचारी अतिरेक थांबला पाहिजे-कुताळ.
श्रीरामपुर शहरातील ऱ्हिदम सोशल फोरम व जिजाऊ मराठा महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी ‘ महिला स्वसरक्षण ‘ या विषयावर मार्गदर्शन करतांना बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ रंजना पाडगावकर होत्या.
या वेळी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, माजी नगराध्यक्षा इंदूताई डावखर,मंजुश्री मुरकुटे,अर्चना पानसरे,कराटे प्रशिक्षक गौतम डे,ऱ्हिदम सोशल फोरम च्या संस्थापक अध्यक्षा रीमा गोसावी,अध्यक्षा गीता चंदन,सचिव नीता धुमाळ, जिजाऊ मराठा महिला मंडळाच्या अध्यक्षा निशा निर्मळ,सचिव भारती काळे यांचेसह ज्योती झंवर,वैशाली खैरनार, सिमरन फेरवानी, अरुणा टाटीया,रमेश चंदन,अनिता सहाणी,उषा मुंदडा, जयश्री नवले,ममता गुप्ता,मिता चंदन,रश्मी ठक्कर,नलिनी कुटे, कल्पना बनकर,प्रा.रुपाली बनकर,डॉ.स्वाती चव्हाण,भाग्यश्री फरगडे,शशिकला लिप्टे,शोभा वारुळे,रंजना कडू,मयुरा निंबाळकर, सुरेखा आभाळे, अलका पवार,प्राजक्ता शिंदे,डॉ.विद्या बडाख,सुप्रिया पवार आदी पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
त्या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि,, आपलं संरक्षण पोलीस करेल,सरकार करेल याचा विचार न करता आपले संरक्षण आपण स्वतः करायला सिद्ध व्हावे.सामाजिक विकृती दूर करण्यासाठी व सुसंस्कृत समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. त्याची मुर्तमेढ आपल्या कुटुंबापासून रोवली पाहिजे.टीव्ही वरच्या सामाजिक विकृती बिंबवणाऱ्या मालिका आणि मोबाईल वापराचा स्वैराचारी अतिरेक थांबला पाहिजे.त्यासाठी माता म्हणून महिला पुढे आल्या पाहिजे कारण महिला या कौटुंबिक संस्काराच्या विद्यापीठाच्या कुलगुरू असतात.मुलांना फार कमी वयात मोबाईल, गाड्या,पार्ट्या या सारख्या चंगळवादी संस्कृतीत अडकवू नये असे आवाहन केले.मुला मुलींशी मनमोकळा संवाद साधून चांगले अन वाईट काय याची जाणीव करून दिली पाहिजे.महिला सतत दुसऱ्यासाठी जगतात त्यांनी स्वतःसाठीही जगावं, मात्र सुसंस्कृत आचारसंहिता पाळून मनसोक्त आंनद लुटावा,लोक काय म्हणतील याचा विचार करू नये असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षा डॉ रंजना पाडगावकर म्हणाल्या स्त्री आता अबला राहिली नाही तर ती सबला झाली आहे.प्रत्येक क्षेत्रात ती पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहे. स्रियांनी स्वतःच्या कमी न लेखता धैर्याने पुढं जायला शिकलं पाहिजे. या वेळी कराटे प्रशिक्षक गौतम डे यांनी महिलांवर हल्ले झाल्यास स्वसंरक्षण कसे करायचे याचे कराटे प्रात्यक्षिक सादर केले.
या वेळी नगराध्यक्षा अनुराधा आदिक,रीमा गोसावी,डॉ कमलजीतकौर बतरा,मयुरा निंबाळकर आदींनीं उपस्थितांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा रुपाली बनकर यांनी केले सूत्रसंचलन नीता धुमाळ व भारती काळे यांनी केले तर आभार नलिनी कुटे यांनी मानले.