जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

मंजूर बंधाऱ्याचे डिझाईन करण्यासाठी माती परीक्षण सुरु

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूज सेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथील मंजूर,चास,हंडेवाडी,धामोरी,मोर्वीस,मायगाव देवी,कारवाडी,वेळापूर,बक्तरपूर आदी गावांच्या शेतीसाठी वरदान ठरणारा गोदावरी नदीवरील कोल्हापूर टाईप बंधारा महापुरामध्ये दोनदा वाहून गेला होता.या पुलाचे दुरुस्तीसाठी निधी मिळावा यासाठी जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांची भेट घेवून मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा अशी मागणी केली होती.त्या मागणीला जलसंपदा विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून मंजूर बंधाऱ्याचे डिझाईन करण्यासाठी माती परीक्षणाचे काम सुरु करण्याचे आदेश दिले असून प्रत्यक्षात माती परीक्षणाचे काम सुरु झाले असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

सन-२०१९ च्या महापुरामध्ये मंजूर बंधारा दुसऱ्यांदा वाहून जाऊन शेतकऱ्यांच्या उभ्या पिकासह शेतजमिनी,विहिरीसह वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.त्यामुळे या बंधाऱ्यावर अवलंबून असलेल्या मंजूर,चास,हंडेवाडी,धामोरी,मोर्वीस,मायगाव देवी,कारवाडी,वेळापूर,बक्तरपूर आदी गावातील शेतीचे अस्तित्व धोक्यात आले होते.

सन-२०१९ च्या महापुरामध्ये मंजूर बंधारा दुसऱ्यांदा वाहून जाऊन शेतकऱ्यांच्या उभ्या पिकासह शेतजमिनी,विहिरीसह वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.त्यामुळे या बंधाऱ्यावर अवलंबून असलेल्या मंजूर,चास,हंडेवाडी,धामोरी,मोर्वीस,मायगाव देवी,कारवाडी,वेळापूर,बक्तरपूर आदी गावातील शेतीचे अस्तित्व धोक्यात आले होते.याबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांची भेट घेतली होती व मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा व या पुलाचे कायमस्वरूपी टिकावू काम करावे आदी मागण्या केल्या होत्या.याबाबत पाठपुरावा सुरु असून जलसंपदा विभागाचे अधिकाऱ्यांनी मागील सहा महिन्यात दोन ते तीन वेळेस प्रत्यक्षपणे या मंजूर बंधाऱ्याची पाहणी केली आहे.चालू वर्षीच्या पावसाळ्यात या बंधाऱ्यात पाणी अडविले जावे त्यादृष्टीने प्राथमिक स्वरूपातील काम मे महिन्याच्या सुमारास हाती घेण्यात आले होते.मात्र जून महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे गोदावरी नदीला नांदुर- मध्यमेश्वर बंधाऱ्यातून सोडण्यात आलेल्या विसर्गामुळे हे काम पूर्ण होवू शकले नाही.मात्र या पुढील काळात मंजूर बंधाऱ्याचे शाश्वत व टिकावू काम करण्यासाठी या बंधाऱ्याचे डिझाईन करण्याचे काम जलसंपदा विभाग करणार आहे.त्यासाठी सी.डी.ओ. (मध्यवर्ती संकल्पचित्र संस्था) नाशिक संस्थेला आराखडा तयार करण्याचे उच्चस्तरीय आदेश प्राप्त झाले असून त्यासाठी या संस्थेने मंजूर बंधाऱ्याच्या परिसरातील भूगर्भातील प्राथमिक माती परिक्षणाबरोबरच भूगर्भात खडक किती खोलीवर आहे त्यानुसार डिझाईन (प्रारूप आराखडा) तयार करण्यात येणार असल्याचे आ. काळे यांनी शेवटी सांगितले आहे.

Related Articles

Close