नगर जिल्हा
मुदतीत कामे न केल्यास ठेकेदारावर करणार दंडात्मक कारवाई,कालवा कृती समितीच्या आंदोलनानंतर आश्वासन
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
उत्तर नगर जिल्ह्यातील सात तालुक्यातील दुष्काळी १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरण प्रकल्पावर पिण्याच्या पाण्याचे आरक्षण अग्रक्रमाने टाकावे व अकोलेतील कालव्यांचे मंदावलेले काम शिघ्रगतीने सुरु करण्यासाठी मुदत संपलेली कामे काढून ठेकेदार बद्लविण्यात यावा आदी दोन मागण्यासाठी निळवंडे कालवा कृती समितीने संगमनेर प्रांत कार्यालयासमोर नुकत्याच करण्यात आलेल्या आंदोलनात जलसंपदाने अकोलेतील ठेकेदार न्यू एशिअन कन्ट्रक्शन कंपनीस दिलेल्या मुदतीत इच्छित मशिनरी कामावर हजर करून जलसंपदाने दिलेला इष्टांक न गाठल्यास आधी दंडात्मक कारवाई करणार असून त्यानंतर कामे काढून घेणार असल्याचे आश्वासन दिल्याने समितीने आपले आंदोलन सोडून दिले आहे.
यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी व प्रांताधिकारी यांनी आंदोलनकर्त्यांशी सायंकाळी पाच वाजता चर्चा करण्यास आंदोलनस्थळी येण्यास नकार दिला त्यावेळी आंदोलन कर्त्यांनी लागलीच दुसरे निवेदन तयार करून त्याच जागेवर प्राणांतिक उपोषण करण्याचे बजावल्याने व पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील,व जलसंपदा मंत्री जयंत पाटील,जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून दिले त्या वेळी जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फटकारल्यावर त्यांनी आंदोलनस्थळी भेट घेतली व लेखी आश्वासन दिल्यावर आंदोलन संपविण्यात आले.
सदरचे सविस्तर वृत्त असे कि,उत्तर नगर जिल्हयातील अकोले,संगमनेर,राहाता,कोपरगाव,श्रीरामपूर,राहुरी ,सिन्नर आदी सात तालुक्यातील दुष्काळी १८२ गावांना वरदान ठरणारा निळवंडे धरण प्रकल्प मंजूर होऊन ४८ वर्ष उलटत आली आहे.मात्र अद्याप या तुषार्त गावांना पिण्याचे व शेती सिंचनाचे पाणी मिळाले नाही.या पार्श्वभूमीवर निळवंडे कालवा कृती समितीने संगमनेर प्रांत कार्यालयासमोर नुकतेच लाक्षणिक उपोषण आयोजित केले होते त्यावेळी कार्यकारी अभियंता भारत शिंगाडे यांच्या वतीने उप-कार्यकारी अभियंता प्रमोद माने यांनी हे लेखी आश्वासन दिले आहे.
सदर प्रसंगी संगमनेरचे प्रांत अधिकारी शशिकांत मंगरुळे ,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संगमनेर विभागाचे कार्यकारी अभियंता बी.एस.अहिरे,उपकार्यकारी अभियंता श्री गायकवाड,जलसंपदाचे उप कार्यकारी अभियंता प्रमोद माने आदींसह कालवा कृती समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले, कार्याध्यक्ष मच्छीन्द्र दिघे,उपाध्यक्ष संजय गुंजाळ,सोन्याबापू उऱ्हे सर,सचिव कैलास गव्हाणे,संघटक नानासाहेब गाढवे,माजी उपाध्यक्ष गंगाधर रहाणे, रमेश दिघे,विठ्ठलराव पोकळे,उत्तमराव जोंधळे,अशोक गांडूळे,सोमनाथ दरंदले,दत्तात्रय शिंदे,गुरुजी,अड्.योगेश खालकर,बाबासाहेब गव्हाणे,रामनाथ पाडेकर,सचिन मोमले,संजय मुर्तडक,भाऊसाहेब साब्दे,भिवराज शिंदे,निळवंडेच्या सरपंच सुनीता उकिरडे,सुनील उकिरडे,साहेबराव गव्हाणे,भाऊसाहेब गव्हाणे,वाल्मिक भडांगे, आदी प्रमुख मान्यवरांसह बहुसंख्येने शेतकरी,कार्यकर्ते उपस्थित होते.
त्यावेळी जलसंपदाने दिलेल्या माहिती प्रमाणे निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे ० ते २८ तर उजव्या कालव्याचे ० ते १८ कि.मी.चे असे ४६ कि.मी.चे काम न्यू एशियन कन्ट्रक्शन कंपनीस दिले आहे.सद्य स्थितीत या कंपनीने मशिनरी वाढवली असली तरी अद्याव ती पुरेशी नाही.आगामी महिन्यात दिलेल्या मुदतीत त्यांनी काम न केल्यास आपण त्यांच्यावर दंडांत्मक कारवाई करण्यात येणार आहे.
त्यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता बी.एस.अहिरे यांनीं १८२ गावांचे पाणी आरक्षण टाकण्यास गत पावणेतीन वर्ष टाळाटाळ केल्याने व वरिष्ठ कार्यालयाने त्यांच्या कारभारावर शेरेबाजी केल्याचे लक्षात आणून देत समितीचे कार्यकर्ते नानासाहेब जवरे,व रुपेंद्र काले रमेश दिघे,मच्छीन्द्र दिघे,गंगाधर रहाणे, नानासाहेब गाढवे,कैलास गव्हाणे या कालवा कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना फैलावर घेतले.व आगामी काळात त्यांनी सकारात्मक कारवाई न केल्यास त्यांच्या विरुद्ध वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागण्याचा इशारा दिला आहे.त्यावेळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाळासाहेब यादव यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.आंदोलन शांततेत पार पडल्याबद्ल कार्यकर्त्यांचे संजय गुंजाळ यांनी आभार मानले आहेत.