नगर जिल्हा
तरुणावर विळ्याने केला झोपेत असताना हल्ला,परिसरात खळबळ
संपादक-नानासाहेब जवरे
श्रीरामपूर(प्रतिनिधी)
राहुरी तालुक्यातील चांदेगाव ग्रामपंचायत हद्दीतील भोसले वस्ती येथील गौतम मंजाबापु भोसले हे झोपेत असताना पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास तोडं बांधलेल्या व्यक्तीने घरात प्रवेश केला व गौतम यांचा गळा विळ्याच्या सहाय्याने कापण्याचा प्रयत्न केला असता अचानक जग आल्याने गौतमने त्यास विरोध करुन पकडण्याचा प्रयत्न केला मात्र सदर ईसम विळा जागेवरच टाकुन पसार झाल्याने परिसर खळबळ उडाली आहे.
मंगळवारी रात्री भोसले वस्ती येथील गौतम मंजाबापु भोसले हे नेहमीप्रमाणे आपल्या घरात झोपलेले होते.कोणीतरी अज्ञात तोंड बांधलेला इसमाने घरात प्रवेश करून झोपेतच त्यांचेवर विळ्याने खूनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र गौतमला एका अचानक क्षणी जाग आल्याने हल्लेखोराचा प्रयत्न असफल झाला आहे.
मंगळवारी रात्री भोसले वस्ती येथील गौतम मंजाबापु भोसले हे नेहमीप्रमाणे आपल्या घरात झोपलेले होते.कोणीतरी अज्ञात तोंड बांधलेला इसमाने घरात प्रवेश करून झोपेतच त्यांचेवर विळ्याने खूनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र गौतमला एका अचानक क्षणी जाग आल्याने हल्लेखोराचा प्रयत्न असफल झाला आहे.गौतमने त्यास विरोध करुन पकडण्याचा प्रयत्न केला असता सदर ईसम विळा जागेवरच टाकुन पसार झाला आहे.जखमी गौतम यास तातडीने साखर कामगार हाँस्पिटलला दाखल करण्यात आले असुन त्याच्या गळ्याला चिरल्यामुळे २२ टाके पडले आहे गौतम हा जागा झाल्यामुळे थोडक्यात बचावला.