नगर जिल्हा
महात्मा फुलेंनी अंधश्रद्धा निर्मुलनाचे काम केले-मुरकुटे
संपादक -नानासाहेब जवरे
श्रीरामपूर(प्रातिनिधी)
सामाजिक क्रांतीचे प्रणेते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य अविस्मरणिय आहे. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करुन जातीपातीचे निर्मुलन तसेच अंधश्रध्दा निर्मुलनाचे काम केले. देशातील दिनदुबळे, वंचित आणि शेतकर्यांना जागवून त्यांच्यात आत्मसन्मान निर्माण करण्याचे महान कार्य केले. आपली धर्मपत्नी सावित्रीबाई फुले यांच्या साथीने महिलांसाठी शिक्षणाचे द्वार खुले करण्याचे थोर कार्य महात्मा फुले यांनी केले असून त्यांनी दाखविलेल्या मार्गावरुन समाजाला पुढे घेवून जाणे हिच खरी त्यांना आदरांजली ठरेल असे प्रतिपादन अशोक उद्योग समुहाचे सुत्रधार माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
आपल्या देशात शेतीच्या अर्थशास्त्राच्या आधाराने सर्वप्रथम अभ्यास कोणी केला असेल तर महात्मा फुले यांचाच उल्लेख करावा लागेल. दोनशे वर्षापूर्वी त्यांनी शेतीचे अर्थशास्त्र, शेतकर्यांच्या समस्या, शेतकर्यांचे आर्थिक परिवर्तन यासंदर्भात केलेले विवेचन आजच्या उच्चशिक्षित अर्थशास्त्रज्ञांनाही अचंबित करायला लावणारे आहेत- माजी आ. मुरकुटे
श्रीरामपूर तालुक्यातील अशोक उद्योग समुहाच्यावतीने कारखाना कार्यस्थळावर महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आले त्यावेळी माजी आ. मुरकुटे बोलत होते.
यावेळी अशोक कारखान्याचे उपाध्यक्ष पोपटराव जाधव, कार्यकारी संचालक देवराव लोकरे, कार्यालय अधिक्षक आप्पासाहेब दुशिंग, प्रकाश पवार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या प्रसंगीं पुढे बोलताना म्हणाले कि,आपल्या देशात शेतीच्या अर्थशास्त्राच्या आधाराने सर्वप्रथम अभ्यास कोणी केला असेल तर महात्मा फुले यांचाच उल्लेख करावा लागेल. दोनशे वर्षापूर्वी त्यांनी शेतीचे अर्थशास्त्र, शेतकर्यांच्या समस्या, शेतकर्यांचे आर्थिक परिवर्तन यासंदर्भात केलेले विवेचन आजच्या उच्चशिक्षित अर्थशास्त्रज्ञांनाही अचंबित करायला लावणारे आहेत. ज्या गोष्टींचे महत्व ब्रिटीश काळात महात्मा फुले यांना उमगले, त्याची अंमलबजावणी आपण स्वातंत्र्यानंतर हरित क्रांतीच्या निमित्ताने केली आहे. त्यामुळे महात्मा फुले यांच्या दूरदृष्टीची व्याप्ती आणि कक्षा ध्यानात येईल असेही मुरकुटे शेवटी म्हणाले.