नगर जिल्हा
श्रीरामपूर ते इंदोर आंतरराज्य बस उत्साहात सुरु
श्रीरामपूर (वार्ताहर) : श्रीरामपूर ते इंदोर आंतरराज्य मार्गावरील बस सेवा बुधावरी दिनांक २० पासुन सुरु करण्यात आली असल्याची माहिती बस स्थानक व्यवस्थापक राकेश शिवरे यांनी दिली आहे.
श्रीरामपूरहुन इंदोर कडे जाणारी बस सकाळी ६.३० वाजता सुटणार असुन परतीच्या प्रवासात इंदोरहुन सकाळी ५.३० वाजता सुटणार आहे. बसचा मार्ग मनमाड, धुळे, शिरपुर, सेंधवा मार्गे इंदोर असा आहे.
विभाग नियत्रंक विजय गिते यांनी सहकार्य दिल्यामुळे बस स्थानकावरुन सुटणारी दुसरी आंतरराज्य मार्गावर जाणारी बस सेवा उपलब्ध झाली आहे. सध्या श्रीरामपुर – सुरत बस सेवा सुरु आहे. सुरत व इंदोर आंतरराज्य बससेवेच्या फायदा घ्यावा असे आवाहन वाहतुक अधिक्षक बाळासाहेब कोते, वाहतुक निरिक्षक किरण शिवरे यांनी केले आहे.
इंदोर बस सेवा सुरु केल्याबद्दल प्रवासी संघटनेच्यावतीने राज्य परिवाहन महामंडळाचे अभिनंदन केले आहे. बस सेवा कायमस्वरुपी सुरु ठेवण्याची अपेक्षाही व्यक्त केली आहे.