नगर जिल्हा
राहाता न.पा.च्या वतीने गांधी जयंती उत्साहात साजरी
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव(प्रतिनिधी)
राहाता नगरपरिषदेत राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लाल बहाद्दुर शास्री यांची जयंती मोठ्या उत्साहात करण्यात आली असून या निमित्त राहाता नगरपालिकेत नगराध्यक्षा ममता पिपाडा यांच्या हस्ते या महान नेत्यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
यावेळी विविध शाळांचे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांच्या समवेत राहाता शहरातुन प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी स्वच्छता राखा,प्लास्टीकचा वापर टाळा अशा विविध घोषणा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लास्टिक मुक्तीच्या घोषणा देण्यात आल्या.