जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात विजेच्या धक्याने विद्यार्थी ठार,अकस्मात मृत्यूची नोंद

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहराच्या पश्चिमेस हाकेच्या अंतरावर असलेल्या जेऊर पाटोदा ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या आपल्या जनावरांना दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास पाणी पाजण्यासाठी विद्युत पंप सुरु करण्यासाठी ग.क्रं.३१ मधील विहिरीवर गेलेला नववीत शिकणारा १६ वर्षीय विद्यार्थी विशाल संतोष बोरावके तेथे विजेचा जोरदार धक्का बसून जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.त्याच्या पच्छात आई,वडील,एक भाऊ असा परिवार आहे.

छायाचित्रात मयत विशाल बोरावके दिसत आहे.

दरम्यान मयत विशाल बोरावके हा गरीब शेतकरी कुटुंबातील होता.व तो कोपरगाव येथील श्रीमान गोकुळचंद माध्यमिक विद्यालयात इयत्ता नववीत शिकत होता.त्याच्या पच्छात एक लहान भाऊ आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्याच्यावर कोपरगाव नगरपरिषद हद्दीत गोदावरी काठी अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

जेऊर पाटोदा ग्रामपंचायत हद्दीत घटनास्थळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी भेट दिली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,वर्तमानात कोपरगावात परतीचा मोठा पाऊस झाला आहे.त्यातच बाजरी,सोयाबीन आदी खरीप पिके काढणीस आली आहे.त्यामुळे घरातील कर्ती माणसे हि आपल्या कामात असताना शाळेला सुट्टी असल्याने घरीच असलेला विद्यार्थी विशाल बोरावके यास वडीलधाऱ्यां मंडळींनी घरी जनावरांना पाणी पाजण्याची जबाबदारी सोपवलेली होती.आज दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास तो आपला गट क्रं.३१,३२ मधील असलेल्या विहिरीवर बसवलेला विद्युत पंप सुरु करण्यासाठी गेला असता तेथे त्यास विजेचा जोरदार धक्का बसला व त्यातच तो गत प्राण झाला आहे.अर्ध्या तासाने आजोबा पुंडलिक बोरावके हे सोयाबीन काढणीचे काम सुरु असल्याने त्याकडे देखरेखी साठी गेले असता त्यांना विहिरीवर एक व्यक्ती पडलेली आढळली.त्यांनी जवळ जाऊन पहिले असता त्यांना जोरदार धक्का बसला.कारण तो त्यांचा नातू विशाल बोरावके हा बेशुद्ध अवस्थेत होता.त्यानीं तातडीने आरडा ओरडा केला व नजीक शेतात सोयाबीन काढत असलेल्या घरातील मंडळींना बोलावून घेतले व विशाल यास जवळच्या कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते.तेथे उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले आहे.

याबाबत शहर पोलिसांना मयताचे आजोबा पुंडलिक बोरावके यांनी खबर दिली आहे.घटनास्थळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी भेट दिली आहे.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यु नोंद क्रं.५३/२०२१ सी.आर.पी.सी.प्रमाणे केली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ढाकणे हे करित आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close