नगर जिल्हा
डॉ.गोंदकर यांची काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डी येथील श्री.साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त डॉ.एकनाथ गोंदकर यांची नुकतीच जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी जाहीर केले आहे.त्यांच्या या निवडीचे जिल्हा भरातून सर्वत्र अभिनंदन होत आहे.
डॉ.एकनाथ गोंदकर यांनी या पूर्वी साईबाबा संस्थांच्या विश्वस्त पदी दोनदा निवड झाली होती व त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अत्यंत प्रामाणिकपणे व पारदर्शकपणे कारभार केला होता.त्या नंतर त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश सहकारी साखर कारखान्याची सन-२००६ साली स्वतंत्र पॅनल देऊन सर्व जागा लढवल्या होत्या व त्यावेळी विखे व कोल्हे यांच्या एकत्रित पॅनलच्या विरुद्ध नऊ जागा बहुमताने निवडून आणल्या होत्या या शिवाय त्याच वर्षात त्यांनी शिर्डी नागरपंचायतची निवडणूक लढवून त्यावेळी बहुमतात निवडूनक जिंकली होती.मात्र त्यांच्या कार्याची पाहिजे अशी कदर झालेली दिसत नाही.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नुकतेच दिलेल्या आदेशान्वये जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी काँग्रेसची जिल्हा काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर केली आहे.त्यात काँग्रेसच्या उप जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.डॉ.एकनाथ गोंदकर यांनी या पूर्वी साईबाबा संस्थांच्या विश्वस्त पदी दोनदा निवड झाली होती व त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अत्यंत प्रामाणिकपणे व पारदर्शकपणे कारभार केला होता.त्या नंतर त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश सहकारी साखर कारखान्याची सन-२००६ साली स्वतंत्र पॅनल देऊन सर्व जागा लढवल्या होत्या व त्यावेळी विखे व कोल्हे यांच्या एकत्रित पॅनलच्या विरुद्ध नऊ जागा बहुमताने निवडून आणल्या होत्या या शिवाय त्याच वर्षात त्यांनी शिर्डी नागरपंचायतची निवडणूक लढवून त्यावेळी बहुमतात निवडूनक जिंकली होती.नंतर काही नगरसेवक फुटून विखे गटाला मिळले होते ती बाब अलाहिदा !पण त्यांनी अनेक वेळा विखे कोल्हे गटाला टक्कर दिलेली असताना त्यांना त्यावेळी विखेंनीं काँग्रेस सोडल्यावर कॉंग्रेसचे राहाता तालुकाध्यक्ष पद मिळाले होते.त्यांचे स्पष्ट बोलणे व प्रामाणिक कारभार हाच त्यांचे भागभांडवल राहिलेले आहे.मात्र काँग्रेसने त्यांना अपेक्षित न्याय दिलेला नाही.आताही त्यांना अध्यक्ष पद मिळणे अपेक्षित असताना त्यांची बोळवण उपाध्यक्ष पदी केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.त्यांच्या निवडीचे राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,आ.सुधीर तांबे,माजी अध्यक्ष अविनाश आदिक,श्रीरामपुर नगरपरिषदेच्या अध्यक्षा अनुराधा आदिक आदींनी अभिनंदन केले आहे.व पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या आहेत.