नगर जिल्हा
सदिच्छा मंडळाकडून..या बँकेला घड्याळाचा आहेर !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेला २०१९ मध्ये शंभर वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने शताब्दी वर्ष साजरे करण्याच्या नावाखाली गुरुमाऊली प्रणित संचालक मंडळाने नफ्यातुन सुमारे एक कोटी रुपयांची तरतुद करून या रक्कमेतुन गैरव्यवहार केल्याचा निषेध करत बँकेच्या कोपरगाव शाखेला एक घड्याळाचा आहेर देऊन प्रतिकात्मक निषेध व्यक्त केला आहे.याची जिल्हाभर उलटसुलट चर्चा सुरु आहे.
जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेला २०१९ मध्ये शंभर वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने शताब्दी वर्ष साजरे करण्याच्या नावाखाली गुरुमाऊली प्रणित संचालक मंडळाने नफ्यातुन सुमारे एक कोटी रुपयांची तरतुद करून या रक्कमेतुन बँकेशी संबंध नसलेल्या विकास मंडळाच्या ईमारतीचा पायाभरणी समारंभ,सावित्रीच्या निवडक लेकींना पुरस्कार,स्वतःच्या कार्यकर्त्यांसाठी खर्ची यावर सुमारे ३६ लाखांची ऊधळपट्टी केली असल्याने त्याच्या निषेधार्थ हा आहेर अर्पण केला आहे.ज्ञानेश्वर माळवे
सदरचे सविस्तर वृत्त असे की,जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेला २०१९ मध्ये शंभर वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने शताब्दी वर्ष साजरे करण्याच्या नावाखाली गुरुमाऊली प्रणित संचालक मंडळाने नफ्यातुन सुमारे एक कोटी रुपयांची तरतुद करून या रक्कमेतुन बँकेशी संबंध नसलेल्या विकास मंडळाच्या ईमारतीचा पायाभरणी समारंभ,सावित्रीच्या निवडक लेकींना पुरस्कार,स्वतःच्या कार्यकर्त्यांसाठी खर्ची यावर सुमारे ३६ लाखांची ऊधळपट्टी केली.याच्या निषेधार्थ सदिच्छा मंडळाने बँकेच्या या घड्याळ वाटपावर बहिष्कार टाकला असून या प्रकाराचा गांधीगिरी करत एक घड्याळाचा शिक्षक बँकेच्या कोपरगाव शाखेला आहेर केला आहे.
या बाबत ज्ञानेश्वर माळवे यांनी म्हटले आहे की,शिक्षक बँकेला उरलेल्या सुमारे ६४ लाखांमधुन सर्व सभासदांना रोख रक्कम वा ठेव पावती द्यावी अशी सभासदांची मागणी होती.परंतु संचालक मंडळाने त्याकडे डोळेझाक करत भ्रष्टाचाराच्या लालसेपोटी सभासदांना भिंतीवरील घड्याळे देण्याचा निर्णय घेतला.सर्व सभासदांनी त्याला विरोध केला.तरीही वर्तमानपत्रात जाहीरात देत एका कंपनीच्या निविदा मागवल्या.निगोशिएशन्स करतांना सर्व संचालकांना विश्वासात घेतले नाही.वर्तमान पत्रात जाहीरात देतांना ज्या घड्याळाची मागणी केली होती ती खरेदी न करता दुसरीच हलक्या दर्जाची घड्याळाची खरेदी पोरबंदर गुजरात येथुन केली.मुंबई सारख्या ठिकाणी अनेक नामांकीत कंपन्या असतांना गुजरात येथुन खरेदी करण्याचे कारण काय ? शिक्षकांच्या घरी घड्याळे नव्हती का ? या व्यवहारात सुमारे ३५ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे.त्याची चौकशीही जिल्हा उपनिबंधक यांच्या मार्फत चालु झाली आहे.
सदिच्छा मंडळाने घड्याळे स्विकारण्यावर बहिष्कार टाकला आहे.
या घटनेने अस्वस्थ होत सदिच्छा मंडळाने गांधीगिरी करत आज शिक्षक बँकेच्या कोपरगाव शाखेत जाऊन सदिच्छा मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर माळवे,कोपरगांव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष विनोदकुमार सोनवणे व संघाचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर वाकचौरे यांनी बँकेस छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेले घड्याळ भेट दिले.शाखाधिकारी जाकीर शेख यांनी घड्याळ स्विकारले.घड्याळाच्या माध्यमातुन भ्रष्टाचार करणार्या संचालक मंडळाने छत्रपती शिवरायांचा आदर्श घेत बँकेचा कारभार स्वच्छ व पारदर्शी करावा अशी अपेक्षा शाखाधिकार्यांकडे व्यक्त केली आहे.