जाहिरात-9423439946
सामाजिक उपक्रम

….या तालुक्यात ‘चालक दिन’ विविध उपक्रमांनी साजरा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुका ट्रक चालक मालक व ट्रान्सपोर्ट असोसिएशन यांच्या वतीने नुकताच काल सकाळी १० वाजेच्या सुमारास येसगाव टोल नाक्याजवळ ‘हॉटेल डिसेंट’ या ठिकाणी ‘वाहन चालक दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.सदर प्रसंगी चालकांसाठी ‘मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर’ संपन्न झाले असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष आयुब कच्छी यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

दरम्यान जवळच असलेला नगर-मनमाड रोडवरील टोल नाका व्यवस्थापक हे चालकांकडून काही कोटी रुपये कमावत असताना त्यांनी या सामाजीक उपक्रमास कोणतेही सहकार्य केले नसल्याची तीव्र प्रतिक्रिया वाहन चालकांमधून उमटली आहे.त्यांनी या बाबत निषेध व्यक्त केला आहे.

“देशातील नागरिकांना आपल्या जीवनावश्यक वस्तू वेळेवर भेटतात.त्याला कारण देशातील वाहन चालक हे आहे.त्यामुळेच देशातील नागरिकांना पाकिस्तान श्रीलंका सारखा वस्तूंचा तुटवडा भासत नाही.कोरोना काळात या गोष्टीचे महत्व देशातील नागरिकांना निर्विवाद पटलेले आहे.त्यामुळे या देशातील चालक-मालक हे देशाची मोठी देशसेवा करतात हे स्पष्ट दिसून आले आहे.मात्र या घटकांच्या महत्वाच्या कार्याचा म्हणावा असा समाजात सन्मान होत नाही हे आपल्या चालकांचे दुर्दैव आहे.म्हणून त्यांना योग्य सन्मान मिळावा त्यांची पिळवणूक थांबवावी यासाठी परिवहन विभागाने ‘चालक दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेतला असून याबाबत कोपरगाव चालक-मालक व ट्रान्सपोर्ट असोसिएशनने हा निर्णय घेऊन त्याची नुकतीच अंमलबजावणी ‘हॉटेल डिंसेन्ट’ या ठिकाणी केली आहे.

सदर प्रसंगी परिवहन अधिकारी विनोद घनवट,श्री निकुंभ,महामार्ग पोलीस अधिकारी, श्री राठोड,कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक्क पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड,येवल्याचे पोलीस अधिकारी भगवान मथुरे,नाशिक येथील ऑल इंडिया मोटर्स काँग्रेसचे अध्यक्ष सचिन जाधव,अंजुजी सिंघल,राहुरीचे विनोद वाणी,रमजान भाई,कोपरगावचे अध्यक्ष आयुब कच्छी,उपाध्यक्ष भरत वैद्य,सचिव शैलेश रावळ, प्रकाश घोडके,मोकेश बाटलीवाल सचिन सोनवणे,वसीम भाई,इक्बाल शेख,सुनील गीते,आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान चालकांच्या आरोग्य शिबिरास ‘नेत्र आय फाउंडेशन’ याचे सहकार्य लाभले होते.’डिसेंट हॉटेल’ संचालक सादिक भाई व यांचा कर्मचारी वृंद आदी मान्यवर यांचे या शिबिरास सहकार्य लाभले आहे.तथापि जवळच असलेला नगर-मनमाड रोडवरील टोल नाका व्यवस्थापक हे चालकांकडून प्रतिदिन काही कोटी रुपये कमावत असूनही त्यांनी या सामाजीक उपक्रमास कोणतेही सहकार्य केले नसल्याचे पाहून वाहन चालकांत तीव्र प्रतिक्रिया वाहन चालकांत उमटली आहे.

या वैद्यकीय तपासणी शिबिर,व नेत्र तपासणी शिबिरास वाहतूकदार संघटनेने मोलाचे सहकार्य केले आहे.यामार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्या चालकांची नेत्र व आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोपरगाव तालुक्यातील चालक-मालक व ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल चालक व मालक व ट्रान्सपोर्ट व्यावसायिक यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close