नगर जिल्हा
विरोधकांनो…सगळे एक व्हा, मी घाबरत नाही -सुजय विखे
पारनेरच्या सभेत विखेंचा शरद पवारांवर हल्लाबोळ
पारनेर(प्रतिनिधी )-लोकसभेच्या या निवडणुकीत माझे आई वडील माझ्याबरोबर नाहीत ही खंत असली तरी सामान्य जनता माझ्यासाठी मायबाप आहेत.त्यामुळे विरोधक कितीही एक झाले तरी मी घाबरत नाही.मला हरविण्यासाठी विरोधक एक होवुन तळ ठोकुन असले तरी सामान्य जनतेच्या जीवावर मी जिंकणारच त्यामुळे विरोधकांनो तुम्ही कितीही तळ ठोका मी घाबरत नाही असा टोला सुजय विखे यांनी शरद पवारांना नाव न घेता लगावला आहे.
पारनेर येथील बाजारतळावर शिवसेना भाजपा व मित्रपक्षाचे उमेदवार डाँ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.विधानसभेचे उपसभापती ना.विजय औटी अध्यक्षस्थानी होते.
यावेळी बोलताना डाँ. सुजय विखे पाटील म्हणाले,सोशल मीडियावर घरचा व बाहेरचा भेदभाव सुरु आहे.आपली लढाई युती विरुद्ध आघाडी आहे.आम्ही समाजकारण, विकास कामे याला प्राधान्य देतो .कुठलेही पद नसताना सामान्य माणसाला आधार देतो. धनशक्ती सर्वांकडेच आहे. राजकारणात सगळे सक्षम आहे. मात्र स्वतच्या खिशाला झळ देण्यात विखे घराणे आघाडीवर आहे.त्यामुळे सामान्य जनताच माझ्या निवडणुकीत आघाडीवर राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.या मतदार संघात दोन उमेदवार राहतील यापैकी कोणता उमेदवार सक्षम आहे हे पाहणे गरजेचे आहे. आम्हा दोघां उमेदवारांची गुन्हेगारी तपासा मगच ठरवा. असेही ते म्हणाले.
यावेळी पालकमंत्री राम शिंदे सभापती राहुल झावरे, जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ दाते,माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब तांबे,भाजपाचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ कोरडे,शिवसेनेचे तालुकाध्यक्ष विकास रोहकले, पंचायत समिती सदस्य डाँ श्रीकांत पठारे, दिनेश बाबर, डाँ भास्कर शिरोळे, सचिन वराळ, बाळासाहेब पठारे,शिवाजी जाधव,सिताराम खिलारी, संदिप सालके आदी मान्यवर उपस्थित होते.