नगर जिल्हा
लोकसभेच्या रणधुमाळीत सबाजी गायकवाडांची विधानसभेची पेरणी…
विक्रीच्या पहील्याच दिवशी घेतला उमेदवारी अर्ज
नगर ( प्रतिनिधी)- नगर दक्षिण मतदार संघात आज उमेदवारी अर्ज विक्रीच्या पहील्याच दिवशी पारनेरचे राष्टवादी काँग्रेसचे नेते सबाजी गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज विकत घेत लोकसभेच्या रणांगणात विधानसभेची साखरपेरणी सुरु केली आहे.विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या बाजार समितीचे सभापती प्रंशात गायकवाड यांच्या पुत्रप्रेमापोटीच त्यांनी ही खेळी खेळली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
पारनेर तालुक्यात राष्टवादी काँग्रेस कडुन विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी अनेकजण गुडघ्याला बाशिंग बाधुन तयार आहे. ही यादी मोठी आहे. यामध्ये बाजार समितीचे सभापती प्रशात गायकवाड यांचाही समावेश आहे. गेल्या दोन वर्षापासुन त्यांनी मतदार संघात व नेतेमंडळीकडे संपर्क वाढविला आहे. लोकसभेला पक्षाचा उमेदवार जाहिर झाला आहे. आमदार सग्राम जगताप निवडणुकीच्या रिंगणात उतरलेही आहेत. मात्र आज अर्ज विक्रीच्या पहील्याच दिवशी सबाजी गायकवांनी अर्ज घेतला आहे.
लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज नेण्याच्या आज ( गुरूवारी ) पहिल्याच दिवशी २१ उमेदवारी अर्जांची विक्री झाली. यामध्ये प्रमुख राजकिय पक्षांच्या कोणत्याही उमेदवारांचा समावेश नसला तरी पारनेर तालुक्यातून सबाजीराव गायकवाड यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे संजीव भोर , वाडेगव्हाण येथील सुरेश रासकर यांचा उमेदवारी अर्ज नेणाऱ्यांच्यात समावेश आहे.सबाजी गायकवाड यांच्या आजच्या भुमिकेमागे पक्षाच्या नेत्यांवर दबाव आणला तर जाणार ना अशी चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली आहे.